IND vs NZ Mumbai Test: न्यूझीलंडचा विक्रमवीर एजेज पटेलचा मुंबई क्रिकेट असोसिएशनने विशेष भेट देऊन केला सत्कार, (See Photo)
एजाज पटेल शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताच्या पहिल्या कसोटी डावात सर्व 10 विकेट घेणारा खेळाच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष विजय पाटील यांनी सोमवारी न्यूझीलंड (New Zealand) फिरकीपटू एजाज पटेलचा (Ajaz Patel) भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या कसोटी सामन्याचे स्कोअरशीट आणि मोमेंटो देऊन सत्कार केला. एजाज पटेल शनिवारी मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर भारताच्या पहिल्या कसोटी डावात सर्व 10 विकेट घेणारा खेळाच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली होती. दुसऱ्या कसोटीत भारताच्या विजयानंतर एजाज पटेलने आगामी MCA संग्रहालयासाठी चेंडू आणि टी-शर्ट सुपूर्द केला. “मी मैदानाबाहेर आल्यानंतर गोष्टी खूप लवकर घडल्या. या प्रकारच्या गोष्टी खरोखर उशिराने विसरत नाहीत. अर्थातच, हा एक विशेष क्षण आहे, मी याबद्दल खोटे बोलणार नाही. हे माझ्यासाठी खास आहे. मी माझ्या कुटुंब, आई आणि बाबा, पत्नीला भेटलो. घरापासून दूर बराच वेळ घालवणे, क्रिकेटपटू असणे सोपे नाही,” एजाज पटेलने शनिवारी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले होते. (IND vs NZ 2nd Test: एजाज पटेलने 14 विकेट घेत मोडला Ian Botham चा विक्रम, टीम इंडियाविरुद्ध पहिल्यांदाच असे घडले)
“मुंबईला, वानखेडेला घरी परतणे आणि असे काहीतरी करणे खूप खास आहे. मी देवाचा आभारी आहे की त्याने मला असा प्रसंग दिला,” तो पुढे म्हणाला. दरम्यान सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 372 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर परतली आहे. न्यूझीलंडवरील विजयाच्या जोरावर भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने शिक्कामोर्तब केला आणि आता विराट कोहलीची टीम इंडिया 26 डिसेंबरपासून तीन कसोटी आणि वनडे सामन्यांसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे.
मुंबई कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर पहिला डाव 62 धावांवर आटोपलेला न्यूझीलंड संघ दुसऱ्या डावात 167 धावाच करू शकला. चौथ्या दिवशी सकाळी केवळ 27 धावांत त्यांचे शेवटचे 5 विकेट गमावले. एजाज पटेलने 14 विकेट्सची विक्रमी नोंद करूनही, त्यांचे फलंदाज उच्च दर्जाच्या भारतीय आक्रमणासमोर दबाव हाताळण्यात अपयशी नसल्याने संघाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतर एका डावात सर्व 10 विकेट घेणारा एजाज हा केवळ तिसरा गोलंदाज ठरला, परंतु तो पराभूत झालेल्या संघासाठी एलिट यादीतील पहिला ठरला.