IND vs NZ 2nd Test Day 2: दुसर्या डावात भारताने 6 विकेट गमावून केल्या 90 धावा, दिवसाखेर न्यूझीलंडवर घेतली 97 धावांची आघाडी
दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडवर 97 धावांची आघाडी घेतली. दिवसाखेर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट ने 3 विकेट घेतल्या. टिम साऊथी, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना क्राइस्टचर्च (Christchurch) मध्ये खेळला जात आहे. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने 6 विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावात फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडवर 97 धावांची आघाडी घेतली. सामन्याच्या दुसर्या दिवशी भारताने न्यूझीलंडविरुद्ध चांगली सुरुवात केली आणि न्यूझीलंडला 235 धावांवर ऑल आऊट केले. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघाला 7 धावांची आघाडी मिळाली. दिवसाखेर भारताकडून हनुमा विहारी 5 आणि रिषभ पंत 1 धावा करून खेळत आहेत. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट (Trent Boult) ने 3 विकेट घेतल्या. टिम साऊथी, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली आणि किवी फलंदाजांना क्रीजवर टिकू दिले नाही. लंचच्या पूर्वीच त्यांनी अर्धा किवी संघ तंबूत पाठवला. दुसऱ्या दिवशी एकूण 16 विकेट्स पडल्या. (IND vs NZ 2nd Test: रवींद्र जडेजा ने न्यूझीलंडच्या नील वॅग्नर ला आऊट करण्यासाठी पकडला '2020 चा सर्वोत्कृष्ट कॅच', पाहा Video)
पहिल्या डावात 7 धावांची आघाडी मिळवल्यानंतर भारताने दुसरा डाव सुरू केला आणि सलामी फजंदाज मयंक अग्रवाल दुसर्याच ओव्हरमध्ये बाद झाला. मयंक दुसऱ्या डावातही प्रभावी खेळ करू शकला नाही 3 धाव करून बोल्टच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट झाला. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणार्या पृथ्वी शॉला विकेटच्या मागे टिम साऊथीने झेलबाद केले. कर्णधार विराट कोहलीही कसोटी मालिकेच्या तिसर्या डावात मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला. कोहलीला कॉलिन डी ग्रैंडहोम 14 धावांवर एलबीडब्ल्यू बाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे 9 आणि चेतेश्वर पुजारा 24 धावा करून माघारी परतले.
सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला आणि 242 धावांवर ऑलआऊट झाला. अशा परिस्थितीत यजमान मोठी धावसंख्या करेल असे वाटत होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पहिला डाव 73.1 ओव्हरमध्ये 235 धावांवर गुंडाळला आणि भारताला 7 धावांची थोडी आघाडी मिळाली. पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराहने 3, रवींद्र जडेजाने 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केले. न्यूझीलंडच्या टॉम लाथम 52, काईल जैमीसन 49 आणि टॉम ब्लेंडल 30 धावा केल्या.