IND vs NZ 2nd Test Day 2: एजाज पटेलचा ‘षटकार’; Lunch पर्यंत शतकवीर मयंक अग्रवालला अक्षर पटेलची साथ, भारताची धावसंख्या त्रिशतका जवळ
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात मुंबई कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकपर्यंत भारताने 6 बाद 285 धावांपर्यंत मजल मारली आहे. अक्षर पटेल आणि मयंक अग्रवाल यांच्यात 61 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. यामध्ये अक्षरने 28 धावांचे योगदान दिले आहे. तर भारताची धावसंख्या त्रिशतक जवळ पोहोचली आहे. न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने आतापर्यंत सर्व सहा विकेट घेतल्या आहेत.
भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड (New Zealand) संघात मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) दुसऱ्या दिवसाच्या लंच-ब्रेकची घोषणा झाली आहे. भारतासाठी शतकवीर मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि अक्षर पटेलची (Axar Patel) जोडी खेळपट्टीवर खेळत आहे. तर भारताने दिवसाच्या पहिल्या सत्राअखेरीस सहा बाद 285 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडसाठी एजाज पटेलने (Ajaz Patel) आतापर्यंत सर्व सहा विकेट घेतल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)