Video: वेलिंग्टन सामन्यात टीम साउथी च्या जबरदस्त गोलंदाजी समोर पृथ्वी शॉ निरुत्तर, उत्कृष्ट स्विंगने आऊट झालेलं पाहून राहिला थक्क

हे पाहून पृथ्वीलाही थोडा धक्का बसला आणि काही काळ स्तब्ध खेळपट्टीवर उभा राहिला.

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/ESPNCricinfo)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध वेल्लिंग्टन येथील बे रिझर्व्ह बेसिन येथे शुक्रवारी पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही भारताचा (India) सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ची ऑफ-मिडल स्टम्पमुळे होणारी समस्या शुक्रही कायम राहिली. दिवसाच्या खेळाच्या पहिल्या तासाला किवी वेगवान गोलंदाज टिम साउथीने (Tim Southee) 16 धावांवर डावलल्यापूर्वी पृथ्वीने वेगवान सुरुवात केली आणि 18 चेंडूत 16 धावा केल्या. पृथ्वीने मयंक अग्रवालच्या साथीने भारताच्या डावाची सुरुवात केली. पृथ्वी एका टोकाला मोठे शॉट्स मारत होता तर मयंक वेळ घेऊन खेळत होता. शॉने सुरुवात चांगली केली, पण पाचव्या षटकातच साउथीच्या उत्तम स्विंग बॉलवर बोल्ड झाला. साऊथीने हाफ-व्हॉली आउटस्विंग बॉल त्यकला, ज्यामुळे शॉ ड्राइव्हवर जाण्यास प्रवृत्त झाला. पण आधी पाहिल्याप्रमाणे शॉ आपला पुढचा पाय न हलवता ड्राईव्ह शॉट मरायाल गेला. पुन्हा एकदा, नवीन बॉल खेळण्यास शॉच्या असमर्थते आणि कमीतकमी फुटवर्कमुळे त्याची पडझड झाली. (IND vs NZ 1st Test: रॉस टेलर याचे अनोखे शतक, टीम इंडियाविरुद्ध पहिल्या सामन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास)

शॉ स्विंग बॉल खेळण्यास अपयशी राहिला. बॉल फिरकी आणि ऑफ स्टम्पला लागला. चेंडू त्याच्या पॅडला लागून ऑफ-स्टंपला लागला आणि शॉ 16 धावांवर बाद झाला. हे पाहून पृथ्वीलाही थोडा धक्का बसला आणि काही काळ स्तब्ध खेळपट्टीवर उभा राहिला. पाहा व्हिडिओ:

आजपासून सुरु झालेल्या सामन्यात किवी कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.यजमान टीमकडून काईल जैमिसनने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जैमिसनने पदार्पणाच्या सामन्यात तीन महत्तवपूर्ण विकेट घेतल्या त्यातील विशेष म्हणजे भारतीय कर्णधार विराट कोहली. कोहलीला जैमिसनने 2 धावांवर १०० वा टेस्ट खेळणाऱ्या रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. मात्र, यापूर्वी त्याने चेतेश्वर पुजाराच्या रूपात पहिली आंतरराष्ट्रीय टेस्ट विकेट मिळवली. पदार्पण सामन्यात जेम्ससनने भारताचे पहिल्या दिवशी चहाच्या वेळेपर्यंत तीन गडी बाद केले. 101 धावा करून भारताने पाच विकेट गमावल्या आहेत.



संबंधित बातम्या

WTC 2025 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया कुठे आहे, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा प्रवेश, पहा ताजे अपडेट

Australia vs India, 4th Test Day 5 Preview: पाचव्या दिवशी भारतीय फलंदाज इतिहास रचतील की ऑस्ट्रेलियन गोलंदाज कहर करतील, पाचव्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल, मिनी लढाई आणि लाइव्ह स्ट्रीमिंगची माहिती घ्या जाणून

New Zealand vs Sri Lanka, T20I Stats: T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांची एकमेकांविरुद्धची कामगिरी, पहा दोन्ही संघांची महत्त्वाची आकडेवारी

ICC WTC 2025 Final: दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत, टीम इंडिया अशी मिळवू शकते पात्रता