IND vs NZ 1st Test: ‘त्याची शिक्षा काय?’, बॉलिंग फॉलो-थ्रूमध्ये आर अश्विनला ताकीद दिल्याबद्दल सुनील गावस्कर यांनी पंचांना फटकारले
अश्विनला चार वेळा इशारा दिल्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी याप्रकरणी मैदानावरील पंच नितीन मेननवर जोरदार टीका केली आहे. अश्विन स्टंप ओलांडून गोलंदाजी करताना दिसला व त्याच्या फॉलोथ्रू कृतीमुळे पंच प्रभावित झाले नाहीत.
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) कानपूर कसोटीच्या (Kanpur Test) तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमला (Tom Latham) बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. त्याआधी त्याने सलामीवीर विल यंगला बाद करून भारताला तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पहिले यश मिळवून दिले होते. तथापि, स्टंपवर गोलंदाजी करताना भारतीय फिरकीपटू अश्विनच्या फॉलो-थ्रू अॅक्शनवर अंपायर खूश दिसले आणि त्याला अनेक वेळा ताकीद दिली. अश्विनला चार वेळा इशारा दिल्यानंतर भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी याप्रकरणी पंच नितीन मेननवर (Nitin Menon) जोरदार टीका केली आहे. रविचंद्रन अश्विन भारताला यश मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता आणि तो स्टंप ओलांडून गोलंदाजी करताना दिसला व त्याच्या फॉलोथ्रू कृतीमुळे पंच प्रभावित झाले नाहीत आणि त्यांनी अश्विनला याबाबत ताकीद दिली. (IND vs NZ 1st Test Day 3: कानपूर कसोटीत अंपायर आणि Ashwin यांच्यात शाब्दिक वाद, अजिंक्य रहाणेने असं शांत केलं प्रकरण)
संतप्त गावसकर यांनी याप्रकरणी पंचांची खरडपट्टी काढली आणि यासाठी कोणताही दंड होऊ नये, असे सांगितले. ते समालोचन करताना म्हणाले, “रहाणे अश्विन दूर आहे आणि तो डेंजर झोनमध्ये जात नाही, असे सांगायला येत होता मग काय हरकत आहे. मला असे वाटते की पंचासाठी हे कठीण आहे कारण काय होते ते तो पाहू शकणार नाही. त्याची शिक्षा काय? हे कुठेतरी लिहिले आहे का? मला माहित आहे की तसे काही नाही. चेंडू हेल्मेटला लागला तर दंड आहे, पण अश्विन असेच करत राहिल्यास दंड आहे का? अश्विन यापुढेही असेच सुरु ठेवेल असे वाटते का?”
दरम्यान, भारतीय कर्णधार रहाणे, अश्विन आणि मैदानावरील पंच नितीन मेनन यांच्यात जोरदार चर्चा झाली. अंपायर नितीन मेनन प्रीमियर ऑफ-स्पिनरवर नाखूष होते कारण त्याने फॉलोथ्रूसह नॉन-स्ट्रायकर्सच्या धावण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणला. अश्विन किवी फलंदाज टॉम लॅथमला राऊंड द विकेट गोलंदाजी करत होता. यादरम्यान अश्विन फॉलोथ्रूमध्ये सरळ न जाता पंचांसमोर क्रॉस करत होता. यामुळे मैदानावरील पंचांकडे तक्रार करण्यात आली आणि नितीन मेनन यांनी अश्विनशी याबद्दल बोलण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडच्या डावाच्या 77 व्या षटकात अंपायर मेनन यांनी अश्विनला पहिले अडवले आणि फॉलो-थ्रूबद्दल इशारा दिला.