IND vs NZ 1st Test Day 4: अजिंक्य रहाणेचा संघर्ष कानपुर कसोटीत देखील सुरू, चेतेश्वर पुजाराची नकोशा विक्रमाची बरोबरी

कानपूरमधील न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात भारताच्या आघाडीच्या फळीचा धुव्वा उडवून यजमानांवर किवी संघाने मजबूत पकड मिळवली. याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणे आणि उपकर्णधार चेतेश्वर पुजारा दडपणाखाली अपयशी ठरले हे पाहणे निराशाजनक होते. चेतेश्वर पुजाराने अवांछित विक्रम प्रस्थापित केला तर रहाणेचे संघर्ष इथेही सुरूच राहिले.

IND vs NZ 1st Test Day 4: अजिंक्य रहाणेचा संघर्ष कानपुर कसोटीत देखील सुरू, चेतेश्वर पुजाराची नकोशा विक्रमाची बरोबरी
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

कानपूरमधील (Kanpur) न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात भारताच्या (India) आघाडीच्या फळीचा धुव्वा उडवून यजमानांवर किवी संघाने मजबूत पकड मिळवली. रविवारी सकाळी न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांनी दणदणीत सुरुवात करून ग्रीन पार्कच्या खेळपट्टीवर नेहमीपेक्षा थोडी अधिक प्रभावी कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांवर दडपण आणले. याशिवाय कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि उपकर्णधार चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) दडपणाखाली अपयशी ठरले हे पाहणे निराशाजनक होते. चेतेश्वर पुजाराने अवांछित विक्रम प्रस्थापित केला आणि अजित वाडेकरच्या तिसऱ्या क्रमांकावर शतक न करता सर्वाधिक डावात फलंदाजी करण्याच्या नकोशा विक्रमाची बरोबरी केली. (IND vs NZ 1st Test Day 4: दुसऱ्या डावात 5 विकेट गमावून टीम इंडिया बॅकफूटवर, पण Lunch पर्यंत न्यूझीलंडवर 133 धावांची आघाडी)

पुजाराने भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमवारीतील महत्त्वाच्या ठिकाणी शतकाशिवाय 39 डाव खेळले आहेत. याशिवाय भारताचे माजी कर्णधार वाडेकर 1968 ते 1974 दरम्यान 39 डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर शतक न करता राहिले होते. पुजाराचा हा सिलसिला 2019 मध्ये सुरू झाला. उल्लेखनीय म्हणजे, पुजारा 2013 ते 2016 दरम्यान 37 डावांमध्ये शतक न करताच खेळला होता. दुसरीकडे अजिंक्य रहाणे, जाच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, रविवारी सकाळी संघ अडचणीत असताना प्रभावी फलंदाजी करण्यात अपयशी ठरला. रहाणेने चौकार मारून आपले खाते उघडले पण पुढच्या चेंडूवर तो डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलच्या चेंडूवर 4 धावांवर बाद झाला. एजाज पटेलने रहाणेला पायचित केलं. विराट कोहलीला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आल्याने त्याने भारताचे स्थायी कर्णधारपद स्वीकारले. तथापि 35 आणि 4 च्या धावसंख्येनंतर, रहाणे मुंबईत 3 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटीसाठी आपले स्थान कायम ठेवेल का हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

दरम्यान, कानपुरमध्ये पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिले सत्र पूर्णपणे किवी गोलंदाजांच्या नावावर राहिले. या सत्रात न्यूझीलंडने चार विकेट घेतल्या आणि लंचपर्यंत भारताची स्थिती 5 बाद 84 धावा अशी झाली असून त्यांना दुसऱ्या डावात आतापर्यंत 133 धावांची आघाडी मिळाली आहे. भारताने पहिल्या डावात 345 धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला 296 धावांवर गुंडाळून 49 धावांची नाममात्र आघाडी घेतली होती.

(The above story first appeared on LatestLY on Nov 28, 2021 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).