IND vs NZ 1st Test 2024 Day 4, Bengaluru Weather Updates: बंगळुरूमध्ये आज कसे असेल हवामान? पाऊसामुळे टीम इंडियाचा खेळ बिघडणार; वाचा वेदर रिपोर्ट

टीम इंडिया अजूनही न्यूझीलंडपेक्षा 125 धावांनी मागे आहे. टीम इंडियासाठी विराट कोहली 70 धावा करून बाद झाला. सरफराज खान 70 धावांवर नाबाद खेळत आहे.

Chinnaswamy Stadium, Bengaluru (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला (IND vs NZ 1st Test 2024) बुधवारपासून सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M. Chinnaswamy Stadium, Bengaluru) पार पडत आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. आज सामन्याचा चौथा दिवस आहे. खेळला 9.15 वाजता सुरूवात होईल. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 49 षटकांत तीन गडी गमावून 231 धावा केल्या होत्या. टीम इंडिया अजूनही न्यूझीलंडपेक्षा 125 धावांनी मागे आहे. टीम इंडियासाठी विराट कोहली 70 धावा करून बाद झाला. सरफराज खान 70 धावांवर नाबाद खेळत आहे.

असे असेल बंगळुरूचे हवामान 

बंगळुरूमध्ये आज पावसाची थोडी शक्यता आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार, आज बंगळुरूमध्ये ढगाळ वातावरण असेल. याशिवाय हलका पाऊसही पडू शकतो. बंगळुरूमध्ये आज तापमान 21 अंश सेल्सिअस असणार आहे. अशा परिस्थितीत सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे सामना काही काळ थांबवला जाऊ शकतो. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st Test Day 4 Live Streaming: दुसऱ्या डावात टीम इंडियाची स्थिती मजबूत, न्यूझीलंडपेक्षा अजूनही 125 धावांनी मागे, येथे जाणून घ्या चौथ्या दिवसाचा खेळ कोणत्या ओटीटी आणि चॅनलवर पाहणार)

भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट

त्याआधी, प्रथम फलंदाजी करताना भारत पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाला. ही भारताची कसोटी डावातील सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंड तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात दहा विकेट गमावून 402 धावांवर बाद झाला. यासह न्यूझीलंडने 356 धावांची मोठी आघाडी घेतली.