Ajinkya Rahane Dances with Daughter: अजिक्य रहाणेची क्वारंटाइन धमाल! चेन्नईच्या हॉटेलमध्ये मुलगी आर्या सोबतचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ एकदा पहाच
क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी रहाणे आपली मुलगी आर्यासोबत धमाल मूडमध्ये दिसला. अजिंक्य आणि आर्याच्या भन्नाट डांसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांद्वारे भरपूर पसंत केला जात आहे.
इंग्लंडविरुद्ध (England) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाचे (Team India) क्रिकेटपटू चेन्नईला पोहोचले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेचा पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. सध्या चेन्नईतील (Chennai) एका हॉटेलमध्ये दोन्ही संघांचे क्रिकेटपटू क्वारंटाइन असून सहा दिवसांनंतर दोन्ही संघ पहिल्या कसोटी सामन्यासाठी सराव करतील. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील या दम्यान पत्नी राधिका धोपवकर आणि मुलगी आर्यासह (Aarya) चेन्नईच्या हॉटेल रूममध्ये आहे. क्वारंटाइनच्या पहिल्या दिवशी रहाणे आपली मुलगी आर्यासोबत धमाल मूडमध्ये दिसला. अजिंक्य आणि आर्याच्या भन्नाट डांसचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांद्वारे भरपूर पसंत केला जात आहे. राधिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाप-लेकीच्या भन्नाट डांसचा व्हिडिओ शेअर केला. (Virat Kohli-Ajinkya Rahane Captaincy Debate: विराट कोहलीसह कर्णधारपदाच्या मोठ्या चर्चेवर अजिंक्य रहाणेने दिले मन जिंकणारे उत्तर)
"क्वारंटाइनमध्ये माझे मनोरंजन," तिने इन्स्टाग्रामवर कॅप्शन लिहीत व्हिडिओ शेअर केला. क्वारंटाइन कालावधीत खेळाडूंची कोविड-19 टेस्ट होण्याचीही अपेक्षा आहे. रहाणे, रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर मंगळवारीच चेन्नईमध्ये दाखल झाले होते. बीसीसीआयने आता खेळाडूंच्या कुटूंबातील सदस्यांना सोबत घेण्याची परवानगी दिली असल्याने अनेक खेळाडू बायको आणि मुलांसोबत प्रवास करताना दिसत आहे. नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांमध्ये कमान सांभाळली होती आणि संघाला पुन्हा एक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात पुढाकाराने नेतृत्व केले. दरम्यान पहा रहाणे बाप-लेकीचा हा धमाल व्हिडिओ:
भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका 5 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. चेन्नईचे एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिल्या दोन कसोटी सामन्यांचे आयोजन केले जाईल. त्यानंतर, तिसरा आणि चौथा कसोटी सामना क्रमश: 24 फेब्रुवारी आणि 4 मार्च दरम्यान अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळला जाईल. तिसरी टेस्ट मॅच गुलाबी बॉलने खेळली जाईल. कसोटी मालिकेनंतर दोन्ही संघ त्याच मैदानावर पाच टी-20 सामन्यात आमने-सामने येतील. टी-20 मालिका 12, 14, 16, 18 आणि 20 मार्च दरम्यान खेळली जाईल. टी-20 सामन्यानंतर 23, 26 आणि 28 मार्च रोजी तीन वनडे सामने खेळले जातील. इंग्लंडने मागील भारत दौर्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-0 ने गमावली. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे आणि टी-20 मालिकादेखील जिंकली.