IND vs ENG T20I 2021: इंग्लंडविरूद्ध टी-20 मालिकेसाठी 'हे' 5 खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्याचे आहेत दावेदार

या दौऱ्यावर अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दोन्ही संघात दिवस/रात्र सामना खेळला जाणार आहे. आज आपण या लेखात पाहणार आहोत इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दावेदार खेळाडूंबद्दल.

IND vs ENG T20I 2021: कोरोना व्हायरसने प्रभावित झालेल्या 2020 नंतर नवीन 2021 वर्षात क्रिकेटचा खेळ हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यंदाचे वर्ष सर्व संघांसाठी पूर्ण पॅक शेड्यूलने भरलेले असणार आहे. टीम इंडियाही याला अपवाद नाही. भारतीय संघ (Indian Cricket Team) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 5 फेब्रुवारीपासून भारत (India) -इंग्लंड (England) मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यावर अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर दोन्ही संघात दिवस/रात्र सामना खेळला जाणार आहे. मात्र, मालिकेपूर्वी टीम इंडियापुढे (Team India) दुखापतींचं ग्रहण आहे. डाऊन अंडर दौऱ्यावर संघाच्या अनेक खेळाडूंना दुखापत झाली आहे ज्यामुळे इंग्लंडविरुद्ध अनेकांच्या खेळण्यावर संशय आहे. आज आपण या लेखात पाहणार आहोत इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दावेदार खेळाडूंबद्दल.

1. रोहित शर्मा

टीम इंडियाचा 'हिटमॅन' न्यूझीलंडविरुद्ध 2019-20 मध्ये अखेरचा टी-20 खेळला. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात दुखापतीमुळे रोहितला वनडे आणि कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. ज्यानंतर त्याने आयपीएलमधून कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले. रोहित संघातील एक मुख्य भाग आहे आणि इंग्लंडविरुद्ध टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी एक मुख्य दावेदार आहे.

2. रिषभ पंत

टीम इंडियाचा युवा फलंदाज पंतने कांगारू संघाविरुद्ध सिडनी टेस्टमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती ज्यामुळे क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी आता वाढत जात आहे. इंग्लंडविरुद्ध पंतवर मधल्या फळीत मजबूत फलंदाजीची अपेक्षा केली जाईल.

3. केएल राहुल

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर राहुलने सलामी फलंदाज म्हून चांगली कामगिरी बजावली, पण इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेसाठी त्याला मधल्या फळीत, चौथ्या स्थानावर संधी मिळू शकते. राहुलच्या रूपात संघाला एक अतिरिक्त विकेटकीपर आणि सलामी फलंदाज मिळू शकतो.

4. हार्दिक पांड्या

मर्यादित ओव्हरमधील आपल्या पुनरागमन मालिकेत हार्दिकने मधल्या फळीत फलंदाज म्हणून चमकदार भूमिका बजावली होती. हार्दिक गोलंडनजी करू शकला नसला तरी त्याने बॅटने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धू-धू धुलाई केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हार्दिकने तीन मालिकेत एकूण 78 धावा लुटल्या. अशा स्थितीत हार्दिकचा समावेश संघाच्या फलंदाजीला अजून मजबूती देऊ शकतो.

5. टी नटराजन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात करणाऱ्या नटराजनला भारतीय संघासाठी घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्याची संधी मिळू शकते. नटराजनने तीन टी-20 सामने खेळले आणि सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. कांगारू संघाविरुद्ध नटराजनची प्रभावी कामगिरी त्याला इंग्लंडविरुद्ध संघात स्थान मिळवून देऊ शकते.

भारत-इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची मालिका 12 मार्चपासून खेळली जाणार आहे. भारत दौऱ्यापूर्वी इंग्लंड संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे जिथे 2 टेस्ट आणि 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल.