IND vs ENG Series 2021: इंग्लंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाकडे आहे ‘हे’ 4 ओपनिंग कॉम्बिनेशन, पण अखेर कोणाची लागणार वर्णी
इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सध्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. तथापि, शुभमन गिलला दुखापत झाली असून मालिकेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गिलच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर रोहितसोबत सलामीला कोण उतरणार याबाबत चर्चा रंगली आहे. पण भारतीय संघाकडे सलामीची 4 ओपनिंग कॉम्बिनेशन आहेत ज्यांचा ते वापर करू शकतात.
IND vs ENG Series 2021: इंग्लंडविरुद्ध (England) ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सध्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. तथापि, टीम इंडियाला (Team India) पहिल्यांदाच जोरदार धक्का बसला. शुभमन गिलला (Shubman Gill) दुखापत झाली असून मालिकेत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमनने सलामीला येत अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या जोडीने टॉप-ऑर्डरवर उत्पादक भागीदारी रचली होती. त्यामुळे आता गिलच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) रोहितसोबत सलामीला कोण उतरणार याबाबत चर्चा रंगली आहे. तसेच निवड समितीने सध्या पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्क्लला श्रीलंका दौऱ्यावरून ब्रिटनला पाठवण्यास नकार दिला आहे. पण काळजी करण्याचे कारण नाही कारण भारतीय संघाकडे (Indian Team) सलामीची 4 ओपनिंग कॉम्बिनेशन आहेत ज्यांचा ते वापर करू शकतात. (IND vs ENG 2021: शुभमन गिलच्या रिप्लेसमेंटवर Sourav Ganguly यांनी सोडले मौन, पाहा काय म्हणाले BCCI अध्यक्ष)
रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal)
रोहित हा अलीकडच्या काही महिन्यांमध्ये भारताचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज ठरला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये त्याने 12 सामन्यात 1094 धावा केल्या. शिवाय, 2019 पासून रोहितने रेड-बॉल स्वरूपात अव्वल फॉर्म कायम ठेवला आहे आणि म्हणूनच, तो या स्थानावर कायम राहील. 2019 मध्ये रोहित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी कसोटी सलामीवीर म्हणून मैदानावर उतरला आणि त्यावेळी त्याचा साथीदार मयंक अग्रवाल होता. त्यामुळे मयंक इंग्लंड दौऱ्यावर देखील रोहितला जोडीदार बनण्यासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतो.
रोहित शर्मा आणि केएल राहुल (KL Rahul)
रोहित आणि राहुलची जोडी कदाचितच सलामीला उतरेल. राहुलने आतापर्यंत सलामीच्या स्थानाबाहेर फक्त सहा डाव खेळले आहे. तथापि, सलामीवीर म्हणून नाही तर मधल्या फळीत राहुलला वापरण्याचा व्यवस्थापनाचा हेतू आहे. तथापि, गिल बाहेर पडल्यामुळे राहुल सलामीची जागा काबीच करू शकतो.
रोहित शर्मा आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari)
पर्थ येथे त्याने चांगली कामगिरी केल्यावर आणि सलामीवीर निराशाजनक असल्याने हनुमा विहारी 2018 मेलबर्न टेस्ट सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. त्यावेळी मयांक अग्रवाल त्याचा सलामीचा साथीदार होता. मधल्या फळीतील एक भक्कम फलंदाज, विहारी त्याच्या तंत्र आणि स्वभावासाठी लोकप्रिय आहे. तसेच विहारी गेल्या काही महिन्यांत काउंटी सामने खेळला असल्यामुळे इतर कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूपेक्षा विहारीला परिस्थितीची चांगली माहिती असेल.
केएल राहुल आणि मयंक अग्रवाल
रोहित सलामी जागेसाठी मुख्य दावेदार आहे, पण ‘हिटमॅन’ जर उपलब्ध नसल्यास राहुल आणि मयंक भारतासाठी डावाची सुरुवात करू शकतात. स्थानिक पातळीवर दोघे जरी यशस्वी ठरले असले तरी टीम इंडियासाठी दोघे तीन सामन्यात सलामीला उतरले आहेत. पण स्थिती उद्भवल्यास इंग्लंडच्या परिस्थितीत टीम इंडिया त्यांना सुरुवात करण्याची जबाबदारी देऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)