IND vs ENG 5th T20I 2021: रोहित-विराटचा इंग्लंडला दणका, इंग्लंडला विजयासाठी 225 धावांचे विशाल लक्ष्य

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील टी-20 मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाने पहिले फलंदाजी कर्तन रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमवून 224 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला विजयासाठी 226 धावांच विशाल लक्ष्य दिलं.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs ENG 5th T20I 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवरील टी-20 मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात यजमान भारतीय संघाने (Indian Team) पहिले फलंदाजी कर्तन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमवून 224 धावांचा डोंगर उभारला आणि इंग्लंडला विजयासाठी 226 धावांच विशाल लक्ष्य दिलं आहे. रोहितने 64 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 32 धावांचे योगदान दिले. शिवाय, कर्णधार कोहली 80 धावा आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) 39 धावा करून नाबाद परतले. सध्या दोन्ही संघातील मालिका 2-2 अशा बरोबरीत असल्यामुळे आजचा हा पाचवा सामना निर्णय असणार आहे. दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून इंग्लिश गोलंदाजांवर दबाव आला ज्यांना त पेलता आला नाही परिणामी यजमान संघाने मोठी धावसंख्या उभारली. आदिल रशीद आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडसाठी प्रत्येकी 1 गडी बाद केला. (IND vs ENG 5th T20I 2021: Chris Jordan ने बाउंड्री लाईनवर घेतला अविश्वसनीय कॅच, व्हिडिओ करेल हैराण)

टॉस गमावून पहिले फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी आज रोहित-विराटची नवीन सलामी जोडी मैदानात उतरली ज्यांनी मार्क वूड-जोफ्रा आर्चर सारख्या गोलंदाजांविरुद्ध वर्चस्व गाजवले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहितला जीवनदान मिळालं. रोहितने 8 व्या ओव्हरमधील 5 व्या चेंडूवर फटका मारला. पण मार्क वुडने तो कॅच सोडला. यामुळे रोहितला 45 धावांवर जीवनदान मिळालं. यानंतर, रोहितने षटकार खेचत मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावलं मात्र, अर्धशतकी खेळीनंतर आऊट झाला. यांनतर, फलंदाजीला आलेल्या यादवने जॉर्डनच्या सलग 3 चेंडूत 3 चौकार ठोकले. अखेर रशीदने सूर्यकुमारला सीमारेषेवर जॉर्डन आणि जेसन रॉयकडे कॅच आऊट करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. सूर्याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. यानंतर, कर्णधार कोहलीने 36 चेंडूत टी-20 कारकिर्दीतील 28वे अर्धशतक ठोकले आणि अखेरीस हार्दिकसह संघाची धावसंख्या दोनशे पार पोहचवली.

विशेष म्हणजे, टीम इंडियाचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इंग्लंडविरुद्ध ही सर्वाधिक धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी त्यांनी डरबन येथे सप्टेंबर 2007 मध्ये 20 ओव्हरमध्ये218/4 अशी धावसंख्या उभारली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now