IND vs ENG 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन पाठोपाठ ‘या’ वेगवान गोलंदाजाच्याही इंग्लंड दौऱ्यातून एक्सिटची शक्यता; County XI सामन्यात झाली दुखापत

दुखापतीमुळे खान बऱ्याच काळासाठी बाहेर राहू शकतो आणि बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाकडे ट्रेंट ब्रिज येथे 4 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेत एक नेट गोलंदाज कमी पडेल.

आवेश खान (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs ENG 2021: काउंटी इलेव्हनविरुद्ध (County XI) डरहम (Durham) येथील पहिल्या सराव सामन्यात झालेल्या अंगठाच्या फ्रॅक्चरमुळे युवा वेगवान गोलंदाज आवेश खानचा इंग्लंड दौरा (England Tour) अचानक संपुष्टात येण्याची शक्यता आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरूनच (India Tour of England) नाही तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघासाठी आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातही त्याच्या खेळण्यावर आता संभ्रम निर्माण झाला आहे. कोविड-19 पॉझिटिव्ह खेळाडूंशी संपर्कात आल्यामुळे सामन्यासाठी खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज खानने काउंटी इलेव्हन संघाचे प्रतिनिधित्व केले. दुखापतीमुळे खान बऱ्याच काळासाठी बाहेर राहू शकतो आणि बीसीसीआयच्या (BCCI) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतीय संघाकडे ट्रेंट ब्रिज येथे 4 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेत एक नेट गोलंदाज कमी पडेल. (IND vs ENG Series 2021: पहिल्या दोन कसोटीसाठी ब्रिटिश संघात स्टोक्ससह 4 खेळाडूंचे पुनरागमन, निलंबित केलेल्या ‘या’ गोलंदाजाचे कमबॅक)

PTI मध्ये दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “अवेश या सामन्यात आणखी काही भाग घेण्याची शक्यता नाही. अंगठा फ्रॅक्चर आहे. तो कमीतकमी महिनाभर गोलंदाजी करणार नाही आणि त्यानंतर पुनर्वसन सुरू होण्याची शक्यता आहे. आणखी तीन दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होईल.” बुधवारी बीसीसीआयने दुखापतीच्या नेमके स्वरूपात तपशीलवार माहिती दिली नाही पण ते म्हणाले: “वेगवान गोलंदाज अवेश खान वैद्यकीय संघाच्या निरीक्षणाखाली आहे. सराव सामन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसाच्या खेळात तो आणखी भाग घेणार नाही.” लक्षात घेण्यासारखे आहे की, आयपीएल 2021 मध्ये आवेश खानने दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगली कामगिरी बजावली. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी 16.5 च्या सरासरीने 14 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 26 प्रथम श्रेणी सामन्यात 100 विकेट्स आहेत आणि त्याने पाच कसोटी सामन्यासह कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले असते असे अनेकांचे मत आहे.

दरम्यान काउंटी इलेव्हन संघाविरुद्ध रोहित शर्माच्या भारतीयब संघाने केएल राहुलचे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 311  धावा केल्या. प्रत्युत्तरात काउंटी इलेव्हन संघाने आतापर्यंत 69 धावांवर 4 विकेट्स गमावल्या असून ते भारताच्या अद्याप 242 धावांनी पिछाडीवर आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif