IND vs ENG 1st ODI 2021: हार्दिक आणि क्रुणाल पांड्या 9 वर्षानंतर टीम इंडियात एकत्र खेळणारे ठरले पहिले बंधू, ‘या’ भावंडांची होती अखेरची जोडी

पहिल्या एकदिवसीय सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधील पांड्या बंधुंचा समावेश झाल्याने नऊ वर्षात पहिल्यांदा असे घडले जेव्हा दोन भावंड एकत्र भारतीय वनडे संघाकडून खेळत आहेत. 2012, म्हणजेच नऊ वर्षापूर्वी इरफान आणि युसुफ पठाण एकदिवसीय सामन्यात एकत्र खेळले होते.

हार्दिक आणि क्रुणाल पांड्या (Photo Credit: Twitter/हार्दिक आणि क्रुणाल पांड्या)

IND vs ENG 1st ODI 2021: मंगळवार, 23 मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध पुण्याच्या (Pune) एमसीए स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी लहान भाऊ हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आपला मोठा भाऊ कृणालला (Krunal Pandya) पहिली वनडे कॅप दिली तो क्षण पांड्या कुटुंबासाठी भावनिक क्षण होता. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत बडोदा संघाचा कर्णधार क्रुणालला उत्कृष्ट कामगिरीचं फळ मिळालं. हार्दिक आणि क्रुणाल पांड्या दोन्ही अष्टपैलू इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे नियमित सदस्य आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमधील पांड्या बंधुंचा समावेश झाल्याने नऊ वर्षात पहिल्यांदा असे घडले जेव्हा दोन भावंड एकत्र भारतीय वनडे संघाकडून खेळत आहेत. 2012, म्हणजेच नऊ वर्षापूर्वी इरफान (Irfan Pathan) आणि युसुफ पठाण (Yusuf Pathan) एकदिवसीय सामन्यात एकत्र खेळले होते. पठाण बंधू काही दिवसांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजच्या विजेत्या इंडिया लेजेंड्स संघाचे सदस्य होते. (IND vs ENG ODI Series 2021: मालिका विजयच नाही तर इंग्लंडला पछाडत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान होण्याची ‘विराटसेने’ला संधी)

अष्टपैलू क्रुणालसह वेगवान गोलंदाज कृष्णाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण केले. कृष्णाचा हा भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे, तर टी-20 भारताकडून खेळलेल्या कृणालचा हा पहिला वनडे सामना आहे. नुकत्याच पार पडलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धेत क्रुणाल व कृष्णाने केलेल्या प्रभावी कामगिरीने प्रभावित केले. क्रुणालने 5 सामन्यांत 388 धावा फटकावून आश्चर्यकारक फलंदाजी दर्शवली, तर कृष्णाने 7 सामन्यांत 14 गडी बाद केले होते. विजय हजारे ट्रॉफीच्या पाच सामन्यांमध्ये कृणालने 129,33 च्या सरासरीने दोन शतके आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 388 धावा केल्या आणि पाच गडी देखील बाद केले. यावर्षी जानेवारीत ह्रदयात ह्रदयविकाराच्या झटक्याने पांड्या बंधूंचे वडील हिमांशू यांनी आपले प्राण गमावले. 29 वर्षीय क्रुणालने वनडेमध्ये पदार्पणापूर्वी 18 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

आजच्या सामन्यात इंग्लंड कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत यजमान संघाला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात कृणाल आणि कृष्णाचा समावेश झाला आहे तर रिषभ पंतला बाहेर बसवले गेले आहे. अशास्थितीत, केएल राहुल संघाचा विकेटकीपर असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif