IND vs BAN, U-19 Asia Cup: अंडर-19 आशिया चषक फायनलमध्ये टीम इंडियाचा दमदार विजय, बांगलादेश संघ 5 धावांनी पराभूत

भारत आणि बांगलादेश दरम्यान अंडर-19 आशिया चषक फायनल मॅचमध्ये मेन इन ब्लूने बंग्ला टायगर्सविरुद्ध विजय मिळवला आणि सातव्यांदा आशिया कप जिंकण्याचा रेकॉर्ड कायम केला. भारताने 5 धावांनी विजय मिळवला.

(Photo Credit: Twitter)

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh)दरम्यान अंडर-19 आशिया चषक फायनल मॅचमध्ये मेन इन ब्लूने बंग्ला टायगर्सविरुद्ध विजय मिळवला आणि सातव्यांदा आशिया कप जिंकण्याचा रेकॉर्ड कायम केला. भारताने 5 धावांनी विजय मिळवला. टॉस जिंकून भारताने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही आणि संपूर्ण संघाला 32.4 ओव्हरमध्ये फक्त 106 धावा करता आल्या. टीम इंडियासाठी कर्णधार ध्रुव जुरेल याने 33 आणि करण लाल याने सर्वाधिक 37 धावा केल्या. शाश्वत रावत याने 19 धावा केल्या. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दोन अंकी स्कोर करता आला नाही.

बांग्लादेश संघ देखील चांगली खेळी करू शकला नाही. आणि धावांवर संपूर्ण संघ बाद झाला. भारताकडून मुंबईच्या अथर्व आंकोळेकर याने निर्णायक कामगिरी केली. अथर्व ने 28 धावांत 5 विकेट घेतल्या. तर, विद्याधर पाटील आणि आकाश सिंह यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. सुशांत मिश्रा याने 1 विकेट घेतली.  एक वेळी भारताचा पराभव निश्चित असे चित्र दिसत होते कारण बांग्लादेशचा कर्णधार अकबर अली आणि मृत्तुंजॉय चौधरी यांनी डाव सावरला आणि संघाला विजयाच्या जवळ नेले होते. पण, भारतीय गोलंदाजांनी आपले वर्चस्व बनवून ठेवले आणि अंतिम वेळी पर्यंत लढत दिली.

करणने अखेरच्या काही ओव्हरमध्ये मोठे शॉट्स खेळले आणि भारताला लढत देण्याऐवढ्या धावा करण्यास सहाय्य केले. बांग्लादेशच्या मृत्युंजयने 18 धावा देत 3 आणि शमीम हुसेन (Shamim Hossain) याने 8 धावांमध्ये 3 विकेट घेत भारताचे कंबरडे मोडले. भारताने गोलंदाजीद्वारे बांग्लादेश फलंदाजांची तारांबळ उडवली. आकाश आणि अथर्वने वर्चस्व राखत बांग्ला फलंदाजांना झटपट माघारी पाठवले.  बांग्लादेशचे चार फलंदाज 16 धावांवर माघारी परतले. कर्णधार अलीने विकेट पडण्याचे सत्र मोडण्याचा प्रयत्न केला. पण, अथर्वने त्याला बाद करत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. भारताच्या गोलंदाजी समोर 6 फलंदाज दुहेरी आकडा गाठताच माघारी परतले. त्यापैकी दोन फलंदाज शून्यावर बाद झाले. गोलंदाजाजीत कमाल करणाऱ्या मृत्युंजयने फलंदाजीने देखील बहुमूल्य योगदान दिले. त्याने 21 धावा केल्या. बांग्लादेशची अवस्था 8 बाद 78 धावा असताना भारताचा विजय पक्का समजला जात होता, पण तन्झिम हसन साकिब (Tanzim Hasan Sakib) आणि रकीबुल हसन (Rakibul Hasan) यांनी संघर्ष केला आणि 23 धावांची भागीदारी केली. पण, त्यांच्या पदरी अपयश आले आणि संपूर्ण संघ 101 धावांवर बाद झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now