IPL Auction 2025 Live

IND VS BAN T20I Series 2024: भारत विरुद्ध बांगलादेश टी20 मालिकेपूर्वी पहा हेड टू हेड रेकॉर्ड, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज, सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज यासह सर्व तपशील घ्या जाणून

रोहितने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

Team India (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team:  भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघांमधील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपल्यानंतर 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होत आहे. ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन सामने होणार आहेत. याआधी भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा क्लीन स्वीप केला होता.

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 14 टी-20 सामने खेळले गेले आहेत ज्यात बांगलादेशला फक्त एकच सामना जिंकता आला आहे. भारताने 13 सामने जिंकले आहेत. उभय संघांमधला शेवटचा T20 सामना 22 जून 2024 रोजी झाला होता. भारताने हा सामना 50 धावांनी जिंकला. (हेही वाचा - ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह जगात भारी; आयसीसी क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान; यशस्वी जैस्वाल विराट कोहली यांच्याही क्रमवारीत सुधारणा )

2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकमेव टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हा रोहित शर्मा भारताचा कर्णधार होता. हा सामना दिल्लीत झाला आणि भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 148 धावा केल्या. बांगलादेशने हे लक्ष्य केवळ तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेत युझवेंद्र चहलने सर्वाधिक (9) विकेट घेतल्या आहेत. चहलने 6 सामन्यात या विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दीपक चहरच्या नावावर आहे, ज्याने 3 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या आहेत. बांगलादेशसाठी, वेगवान गोलंदाज अल-अलीम-हुसैनने भारताविरुद्धच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत. त्याने 7 सामन्यात या विकेट घेतल्या होत्या.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने 13 सामन्यात 36.69 च्या सरासरीने 477 धावा केल्या आहेत. रोहितने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याचवेळी बांगलादेशच्या सब्बीर रहमानने भारताविरुद्धच्या 6 टी-20 सामन्यांमध्ये सर्वाधिक 236 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 47.20 होती.