IND vs BAN 3rd T20I: के एल राहुल, श्रेयस अय्यर यांच्या झुंझार खेळीचं कौतुक; तर शिखर धवन, रिषभ पंत यांना संघातून वगळण्याची केली मागणी, पहा Tweets

धवनने आजच्या सामन्यात 16 चेंडूंत केवळ 19 धावा केल्याने सोशल मीडिया यूजर्स निराश झाले आहेत आणि त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणीही होत आहे. दुसरीकडे, ट्विटरवर श्रेयस आणि राहुल यांच्या फलंदाजीचे कौतुक केले जात आहे.

Shikhar Dhawan (Photo Credits: Getty)

भारत (India) आणि बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा तिसरा आणि अंतिम टी-20 नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळला जात आहे. बांग्लादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 गडी गमावून 174 धावा केल्या आहेत. पण, पहिले फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने 35 धावांवर त्यांचे दोन्ही सलामी फलंदाज-रोहित शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांची महत्वपूर्ण विकेट गमावली. रोहित 2, तर धवन 19 धावांवर माघारी परतला. यानंत सर्व जबाबदारी मधल्या फळीवर आली. आणि आजच्या सामन्यात यांनी निराश केले नाही. के एल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी शानदार फलंदाजी केली आणि संघाच्या मोठ्या स्कोर करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. (IND vs BAN 3rd T20I: के एल राहुल, श्रेयस अय्यर यांचे झुंझार अर्धशतक; बांग्लादेशला विजयासाठी 175 धावांचे आव्हान)

राहुलने आज भारतीय संघासाठी (Indian Team) 35 चेंडूत 52 धावांचे शानदार डाव खेळला. आपल्या खेळीदरम्यान राहुलने 7 चौकार ठोकले. शिवाय, श्रेयस अय्यरनेही संघासाठी 32 चेंडूत 62 धावांची खेळी केली. धवनने आजच्या सामन्यात 16 चेंडूंत केवळ 19 धावा केल्याने सोशल मीडिया यूजर्स निराश झाले आहेत आणि त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणीही होत आहे. दुसरीकडे, ट्विटरवर श्रेयस आणि राहुल यांच्या फलंदाजीचे कौतुक केले जात आहे. इतकेच नाही, तर धोनीचा पर्याय म्हटला जाणारा रिषभ पंत (Rishabh Pant) 6 धावांवर बाद झाल्याने त्याच्यावरही टीका केली जात आहे.

भारताच्या डावानंतर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

टॉप-ऑर्डरवर शिखर धवनची जागा घेण्याची वेळ आली आहे का?

राहुलचा टी-20 क्रिकेटमध्ये मागील 2-3 वर्षातील सर्वोत्कृष्ट स्ट्राइक-रेट आहे

शिखर धवनच्या जागी सलामीवीर म्हणून रिषभ पंतला प्रयत्न करण्याबद्दल तुमचे काय मत आहे?

टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून सलामीवीर म्हणून धवन हा अजून एक चांगला पर्याय आहे?

जेव्हा शिखर धवन टी -20 मध्ये खेळतो ..

भारतीय चाहते

धोनी संघात परत येण्यासाठी रिषभ पंत प्रयत्नशील

मनीष पांडेला पंतच्या आधी फलंदाजीसाठी पाठवायचे

दरम्यान मधल्या फळीतील फलंदाज श्रेयसने आपल्या आंतरराष्ट्रीयटी-20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. अय्यरने राहुलसह चांगली भागीदारी करून संघाला अडचणीतून बाहेर काढले आणि त्यानंतर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रोहित लवकर बाद झाल्याने श्रेयस तिसऱ्या ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी आला. अय्यरने या संधीचा चांगला फायदा उठविला आणि टी-20 कारकीर्दीतील सर्वात मोठा डाव त्याने खेळला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif