IND vs BAN 1st Test Day 1: मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा यांची तुफान फलदांजी; पहिल्या दिवसाखेर भारत बांग्लादेशच्या 64 धावा मागे

या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एका विकेटच्या जोरावर 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर बांगलादेश सध्या 64 धावा मागे आहे. मयंकने चेतेश्वर पुजारा याच्या साथीने डाव सावरला आणि सावध खेळ करत चौकार लागवण्याचे सत्र सुरु ठेवले. मयंक आणि पुजाराने वेगाने धावा केल्या.

रोहित शर्मा (Photo Credit: IANS)

भारत (India)-बांग्लादेश (Bangladesh) यांच्यातील इंदोरच्या च्या होळकर स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात बांग्लादेशने टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली. कर्णधार मोमिनुल हक याचा निरणाऱ्य चुकीचा ठरला आणि बांग्लादेश संघ 150 धावांवर ऑल आऊट झाला. यानंतर भारतीय संघ फलंदाजी करत पहिल्या दिवसाखेर 1 बाद धावा केल्या. या सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एका विकेटच्या जोरावर 86 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर बांगलादेश सध्या 64 धावा मागे आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले होते. बांग्लादेशला 150 धावांवर ऑल आऊट करत मयंक अग्रवाल (Mayank Agrawal) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी डावाची सुरुवात केली. दोंघांमध्ये 14 धावांची भागीदारी झाली. दरम्यान, रोहित अबू जाएद याच्या चेंडूवर विकेटच्या मागे लिटन दास याच्या हाती झेल बाद झाला. रोहितने 6 धावा केल्या. याच्यानंतर मयंकने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्या साथीने डाव सावरला आणि सावध खेळ करत चौकार लागवण्याचे सत्र सुरु ठेवले. मयंक आणि पुजाराने वेगाने धावा केल्या. खेळ संपला तेव्हा मयंक नाबाद 37 आणि पुजारा नाबाद 43 धावांवर खेळत होते. (IND vs BAN 1st Test Day 1: मोहम्मद शमी याने घेतल्या 3 विकेट, बांग्लादेशचा पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात)

टॉस जिंकून जिंकल्यानंतर पहिले फलंदाजी करताना इम्रुल कयास आणि शादमन इस्लाम यांनी बांग्लादेशच्या डावाची सुरुवात केली. बांग्लादेशसाठी मुशफिकुर रहीम आणि मोमीनुल हक यांनी सर्वाधिक धावा केली. रहीम 43 आणि मोमीनुल37 धावांवर बाद झाला. दुसरीकडे, मोहम्मद शमी याने सर्वाधीक 3 गडी बाद केले. इशांत शर्मा, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी 2 विकेट मिळाल्या. अश्विनने विरोधी संघाचा कर्णधार मोमिनुलला बोल्ड केले आणि घरच्या मैदानावर खेळताना 250 टेस्ट विकेट घेण्याचा पराक्रम केला.

भारत-बांग्लादेशमध्ये आजवर एकूण 9 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या 9 कसोटींपैकी भारतीय संघाने 7 सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. दरम्यान, आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये बांग्लादेशचा हा पहिला सामना आहे, तर टीम इंडियाने आजवर 5 सामने खेळले आहेत. आणि सर्वांमध्ये विजय मिळवला आहे. बांग्लादेशविरुद्ध भारतीय संघ विजय मिळवत विजय रथ सुरु ठेवण्याच्या निर्धारित असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement