IND vs AUS Test, Perth Pitch Report: पर्थची कशी असेल खेळपट्टी ? सामन्याच्या 10 दिवस आधी आले अपडेट, क्युरेटरने टीम इंडियाला दिला इशारा

पर्थची खेळपट्टी वेगवान गती आणि उसळीसाठी ओळखली जाते आणि यावेळीही खेळपट्टीचा मूड असाच राहू शकतो. अशा स्थितीत पहिली कसोटी ही फलंदाजांसाठी खडतर कसोटी म्हणता येईल.

Perth Stadum (Photo Credit - X)

Australia National Cricket Team vs India National Cricket Team:  भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला (Border-Gavaskar Trophy) सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना पर्थमध्ये (Perth) खेळवला जाणार आहे, जिथे टीम इंडियाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पर्थची खेळपट्टी वेगवान गती आणि उसळीसाठी ओळखली जाते आणि यावेळीही खेळपट्टीचा मूड असाच राहू शकतो. अशा स्थितीत पहिली कसोटी ही फलंदाजांसाठी खडतर कसोटी म्हणता येईल. ईएसपीएन क्रिकइन्फो माहिती देताना ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुख्य क्युरेटर आयझॅक मॅकडोनाल्ड म्हणाले, "हे ऑस्ट्रेलिया आहे, हे पर्थ आहे. मला खात्री करून सांगतो आहे की खेळपट्टी गोलंदाजांना वेग देते, बाउंस देते आणि चेंडू चांगल्या प्रकारे उसलतो."

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जशी खेळपट्टी तयार करण्यात आली होती, तशीच खेळपट्टी तयार करण्याचा मॅक्डोनाल्डचा प्रयत्न आहे. त्या सामन्यात एकूण 35 विकेट पडल्या, त्यापैकी 28 विकेट वेगवान गोलंदाजांच्या नावावर होत्या. पाकिस्तान संघ हा सामना 360 धावांनी हरला होता. (हे देखील वाचा: Mohammed Shami Comeback: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी मोहम्मद शमी तंदुरुस्त, वर्षभरानंतर 'या' दिवशी खेळणार पहिला सामना)

भारताची अवस्था पाकिस्तानसारखी होणार!

पर्थचे ऑप्टस स्टेडियम 2017 पासून सातत्याने कसोटी सामन्यांचे आयोजन करत आहे. खेळपट्टी कशी दिसेल या प्रश्नावर क्युरेटर मॅकडोनाल्ड म्हणाले की 10 मिमी गवत सोडण्याचा विचार केला जात आहे. गेल्या वर्षीही अशी खेळपट्टी चांगली ठरली होती आणि सुरुवातीचे काही दिवस खेळपट्टी स्थिर राहिली. खेळपट्टीवरील गवत म्हणजे वेगवान गोलंदाजांना मदत करणे होय.” मॅकडोनाल्ड म्हणाले की, गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्याप्रमाणे या वेळीही वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी तयार केली जात आहे.

गोलंदाज ठरणार वरचढ

दोन्ही संघांच्या पथकांवर नजर टाकल्यास, जसप्रीत बुमराह, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि मोहम्मद सिराज या पाच वेगवान गोलंदाजी पर्यायांसह भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आहे. याशिवाय नितीश कुमार रेड्डी यांचाही वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने फक्त पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे, ज्यात मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि मिचेल मार्श यांच्यासह पाच वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif