IND vs AUS 4th Test 2021: रोहित शर्मा नॉन-स्टॉप! गब्बा टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी जबरदस्त कॅच पकडत टिम पेनला धाडलं माघारी (Watch Video)

पेन आणि ग्रीनची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना शार्दूलने मोठा ब्रेक मिळवून दिला आणि कांगारू संघाच्या कर्णधाराला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं.

टिम पेन आणि रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) दुसऱ्या दिवशी शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) जबरदस्त गोलंदाजी करत टीम इंडियाला मॅचमध्ये दिवसाच्या पहिल्या सत्रात कमबॅक करून दिलं. कांगारू संघाने त्रिशतकी धावसंख्या पार केली असताना कर्णधार टिम पेनने (Tim Paine) अर्धशतक ठोकले. पेनने कॅमरुन ग्रीनसह 98 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. पेन आणि ग्रीनची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना शार्दूलने मोठा ब्रेक मिळवून दिला आणि कांगारू संघाच्या कर्णधाराला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. विशेष म्हणजे पेन दुसऱ्या स्लिपमध्ये असलेल्या रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कॅच आऊट होऊन माघारी परतला. रोहितने गब्बा येथे सुरु असलेल्या सामन्यातील आपला तिसरा कॅच पकडला. शार्दूल ठाकूरच्या आउट-स्विंगर चेंडू पेनच्या बॅटच्या कडेला लागून थेट रोहितच्या हातात गेला ज्याने जराशीही चूक न करता जबरदस्त झेल पकडला आणि पेन-ग्रीन यांच्यातील घातक भागीदारी मोडली. (IND vs AUS 4th Test 2021: रिषभ पंतची बडबड थांबेना, ब्रिस्बेन टेस्ट सामन्यात मॅथ्यू वेडची स्लेजिंग करणाऱ्या भारतीय विकेटकीपरवर भडकले ऑस्ट्रेलियन दिग्गज)

पेन शार्दूलचा तिसरा बाली ठरला. यापूर्वी, पहिल्या दिवशी रोहितने पहिले कांगारूंचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि नंतर स्टिव्ह स्मिथचा शानदार झेल पकडत आपल्या फिटनेसवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. रोहित सिडनी टेस्टमधून आयपीएलनंतर मैदानावर परतला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या सामन्यात रोहित चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करू शकला नाही, पण दुसऱ्या दावत त्याने ती कसर भरून काढली आणि 52 धावा चोपल्या. रोहितने शुभमन गिलच्या साथीने तिसऱ्या सामन्यात पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत चांगली सुरुवात करून दिली. आणि आता गब्बा टेस्टमध्ये देखील दोंघांवर आक्रमक सुरुवात करून देण्याची मोठी जबाबदारी असेल.

मालिकेच्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात भारताकडून टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना कसोटी पदार्पण केलं. दोन्ही पहिल्या आंतरराष्ट्रीय टेस्टच्या पहिल्या डावात चमकदार कामगिरी बजावली आणि प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. सध्या चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहे.