IND vs AUS 3rd Test Day 3 Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट मॅच लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test Day 3 Live Streaming: सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर, शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यातील 70 धावांच्या भागीदारीनंतर टीम इंडिया दिवसाखेर 2 बाद 96 धावा केल्या. आणि आता तिसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्यावर मोठी धावसंख्या करण्याची जबाबदारी असेल. तिसऱ्या दिवशी भारतीय वेळेनुसार सकाळी 4:30 वाजता खेळ सुरु होईल. भारतीय चाहते सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अ‍ॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (Ravindra Jadeja Runs Out Steve Smith: रवींद्र जडेजाच्या अचूक थ्रो ने स्टिव्ह स्मिथ रनआऊट, संजय मांजरेकर यांच्यासह अष्टपैलूच्या फिल्डिंगवर Netizens फिदा, पहा Tweets)

दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने पहिले अर्धशतक ठोकले. एक वर्षानंतर पहिला आंतराष्ट्रीय सामना खेळणारा रोहित शर्मा 26 धावाच करू शकला. गोलंदाजीत जडेजाने जबरदस्त गोलंदाजी केली आणि सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर ऑस्ट्रेलियासाठी स्टिव्ह स्मिथला सूर गवसला आणि 131 धावांचा मोठा डाव खेळला. मार्नस लाबूशेनने 91 तर पदार्पणवीर विल पुकोवस्कीने 62 धावांचे योगदान दिले.

पहा भारत-ऑस्ट्रेलियाचा SCG मधील प्लेइंग इलेव्हन

भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी.

ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन-विकेटकीपर), डेविड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबूशेन, स्टिव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेजलवुड.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement