IND vs AUS 3rd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि TV Telecast ची संपूर्ण माहिती
सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.
IND vs AUS 3rd ODI Live Streaming: कॅनबेराच्या (Canberra) मनुका ओव्हल मैदानावर यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय संघ (Indian Team) एकदिवसीय मालिकेत अंतिम वेळा आमने-सामने येतील. मालिकेचे पहिले दोन्ही सामने गमावलेल्या टीम इंडियापुढे (Team India) क्लीन स्वीप टाळण्याचे आव्हान असेल, तर ऑस्ट्रेलिया भारतीय संघावर निर्विवाद वर्चस्व गाजवू पाहत असेल. तीन सामन्यांच्या पहिल्या दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने बॅटने वर्चस्व गाजवले तर भारताच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. कॅनबेराच्या मनुका ओव्हल (Manuka Oval) येथे खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:10 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 8:40 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाइव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. (IND vs AUS 2020-21: डेविड वॉर्नरच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळण्यावर संभ्रम; 'ओपनरची दुखापत इतरांसाठी संधी', कोच Justin Langer यांचे विधान)
ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पाहिले दोन्ही सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. यजमान संघाने दोन्ही सामन्यात तीनशेहुन अधिकची धावसंख्या उभारली असून क्लीन स्वीपच्या शोधात पुन्हा एकदा आव्हानात्मक धावसंख्या गाठू गाठत असतील. डेविड वॉर्नरच्या दुखापतीचा संघाला मोठा फटका बसला असला तरी अन्य खेळाडू आपल्या खेळीने विजय मिळवू शकतात. दुसरीकडे, टीम इंडियाला आपल्या गोलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. गोलंदाजांनी दोन्ही सामन्यात तीनशेहून अधिक धावा दिल्या आहेत. जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल यांनी सर्वाधिक धावा लुटवल्या आहेत. त्यामुळे क्लीन स्वीप टाळण्यासाठी त्यांना जबरदस्त कामगिरी करण्याची गरज आहे.
पाहा ऑस्ट्रेलिया आणि भारत वनडे संघ
ऑस्ट्रेलिया वनडे टीम: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन , ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अॅडम झांपा, जोश हेजलवुड, अॅश्टन अगर, मोइसेस हेनरिक्स, मॅथ्यू वेड, सीन अॅबॉट, अँड्र्यू टाय, कॅमरून ग्रीन आणि डॅनियल सॅम्स.
भारतीय वनडे टीम: शिखर धवन, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, कुलदीप यादव आणि शुभमन गिल.