IND vs AUS 2nd Test 2020: बॉक्सिंग-डे टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया गाठणार शंभरी, MCG मध्ये भारत- कांगारू संघात रंगणार खास सामना
या सामन्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक खास शंभरीची नोंद करेल. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा 100वा टेस्ट मॅचसाठी मेलबर्नच्या मैदानावर उतरेल.
IND vs AUS 2nd Test: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न (Melbourne) येथे खेळला जाईल. अॅडिलेड ओव्हल येथील पहिली कसोटी जिंकून कांगारू संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया त्यांचा नियमित कर्णधार विराट कोहली शिवाय मैदानात उतरेल, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेवर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील सामना भारतासाठी खास ठरणार असेल. या सामन्यासाठी भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक खास शंभरीची नोंद करेल. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा 100वा टेस्ट (IND vs AUS 100th Test) मॅचसाठी मेलबर्नच्या मैदानावर उतरेल. यापूर्वी टीम इंडियाने कांगारू संघाविरुद्ध 99 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात संघाने 28 सामने जिंकले असून 43 सामने गमावले आहेत. ऑस्ट्रेलिया भारताच्या कसोटी इतिहासातील दुसरा देश असेल ज्याविरुद्ध तो 100 कसोटी सामने पूर्ण करेल. (India's Playing XI for 2nd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेच्या दुसर्या टेस्ट सामन्यात अर्ध्या टीम इंडियामध्ये होणार बदल, पहा कसा असेल प्लेइंग इलेव्हन)
इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत भारताने सर्वाधिक 122 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच वेस्ट इंडीजविरुद्ध 98, पाकिस्तानविरुद्ध 59, न्यूझीलंड 59, श्रीलंकेविरुद्ध 44, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 39, बांग्लादेशविरुद्ध 11, झिम्बाब्वेविरुद्ध 11 आणि अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी सामना खेळला आहे. 1932 मध्ये भारताच्या कसोटी क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 543 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी 157 सामने जिंकले आहेत, तर 168 सामने गमावले आहेत, एक सामना टाय आणि 217 सामने अनिर्णित आहेत. विशेष म्हणजे स्वतंत्र देश म्हणून भारताने पहिली कसोटी मालिका 1947/48 दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील भारत तिसरा देश असेल ज्याच्याविरुद्ध तो 100 कसोटी सामने पूर्ण करेल. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 351 आणि वेस्ट इंडिजविरूद्ध 116 टेस्ट मॅचेस खेळले आहेत.
26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यावर दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असेल कारण अॅडिलेड कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघावर पुनरागमन करण्याचे आव्हान आहे. याशिवाय अजिंक्य रहाणे नियमित कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीत कांगारू संघाला कसे उत्तर देण्यास सक्षम आहे हे पाहणे देखील मनोरंजक ठरणार आहे. या कसोटी सामन्याबद्दल बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत मिळतील.