IND vs AUS 2nd Test: भारताविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट मॅचसाठी असा असणार ऑस्ट्रेलियाचा Playing XI, कोच जस्टिन लँगरने केली घोषणा

भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघात 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्ट मॅचला सुरुवात होईल.

ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम (Photo Credit: Getty)

IND vs AUS 2nd Test: अ‍ॅडिलेड ओव्हलच्या (Adelaide Oval) मैदानावर भारतीय संघाला (Indian Team) धूळ चारलेला ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन (Australia XI) मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) उतरेल अशी घोषणा कांगारू संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर (Justin Langer) यांनी नुकतीच केली. भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया संघात 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या कसोटी सामन्याला दोन दिवस शिल्लक असताना लॅंगर यांनी सांगितले की, पुढील दोन दिवसांत अनपेक्षित दुखापत झाल्याशिवाय ऑस्ट्रेलिया एमसीजी (MCG) येथे झालेल्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणार नाही. अ‍ॅडिलेडमध्ये जिंकलेल्या संघात बदल करण्यासाठी त्याला "खूप धैर्यवान" व्हावे लागेल असे लॅंगर म्हणाले. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामी फलंदाज डेविड वॉर्नर दुसऱ्या कसोटीला देखील मुकणार आहे. वॉर्नरला भारताविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना मांडीची दुखापत झाली होती ज्यातून तो अद्यापही सावरत आहे. (IND vs AUS 2nd Test: बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमधून डेविड वॉर्नर, सीन एबॉट आऊट; मेलबर्न कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी दिलासा)

वॉर्नरच्या अनुपस्थितीत जो बर्न्ससोबत मॅथ्यू वेड सलामीला येईल. "शेवटच्या सामन्यानंतर या कसोटी सामन्यासाठी इलेव्हन बदलण्यासाठी मी खूपच धैर्यवान पुरुष होईन," लँगर म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की पुढील काही दिवसात दुखापत वगळता प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे. या टप्प्यावर, पुढील काही दिवसांत काही न घडल्यास - आणि आपण ज्या जगात राहतो त्या जगात काही होऊ शकत नाही - आम्ही त्याच इलेव्हनबरोबर जाऊ," असे ते म्हणाले. दरम्यान, बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी प्रत्येक दिवशी 30,000 प्रेक्षक एमसीजी स्टेडियममध्ये मॅचचा आनंद लुटू शकतात. एमसीजीमध्ये मार्च महिन्यात महिला टी-20 वर्ल्ड कप 2020 चा अंतिम सामना खेळला गेला होता त्यानंतर कोरोना काळात पहिल्यांदा या स्टेडियममध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी परवानगी मिळाली आहे.

पाहा ऑस्ट्रेलियाचा एमसीजीमधील प्लेइंग इलेव्हन:जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरुन ग्रीन, टिम पेन (कॅप्टन-विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि जोश हेझलवूड.