IND vs AUS 2nd Test: बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमधून डेविड वॉर्नर, सीन एबॉट आऊट; मेलबर्न कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी दिलासा
या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आणि टीम इंडियासाठी दिलासादायक माहिती म्हणजे कांगारूंचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर दुसऱ्या मॅचमधूनही बाहेर पडला आहे. वॉर्नरची प्रकृती सुधारली पण डावखुरा बॉक्सिंग डे कसोटीच्या निवडीसाठी उपलब्ध होणार नाही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली.
IND vs AUS 2nd Test: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघात 26 डिसेंबरपासून बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचला सुरुवात होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) हा सामना खेळला जाईल. अॅडिलेड ओव्हल येथील पहिल्या टेस्टमध्ये पराभूत झाल्यावर टीम इंडियापुढे (Team India) पुनरागमन करण्याचे कडू आव्हान असेल, शिवाय विराट कोहली देखील आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मानिमित्त मायदेशी परतला आहे. अशा स्थितीत भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आणि टीम इंडियासाठी दिलासादायक माहिती समोर अली आहे. कांगारूंचा सलामी फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या मॅचमधूनही बाहेर पडला आहे. भारताविरुद्ध दोन वनडे आणि पहिली कसोटी गमावल्यानंतर वॉर्नरची प्रकृती सुधारली पण डावखुरा बॉक्सिंग डे कसोटीच्या निवडीसाठी उपलब्ध होणार नाही याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुष्टी केली. शिवाय, सराव सामन्यात काल्फ इंज्युरी झालेला अष्टपैलू सीन एबॉटला (Sean Abbott) देखील दुसऱ्या सामन्याला मुकावे लागणार आहे. (भारतात परतण्यापूर्वी विराट कोहली याने बोलावली खास मिटिंग; संघातील युवा खेळाडूंना केले मार्गदर्शन)
सिडनी येथे कोविड-19 चा उद्रेक झाल्यानंतर दोन्ही खेळाडू राज्य सीमा बंद होण्यापूर्वी मेलबर्नला रवाना झाले होते आणि आता 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणाऱ्या तिसर्या कसोटी सामन्यापूर्वी संघात पुन्हा सामील होतील. “क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल बॉक्सिंग डे कसोटीसाठी योग्य वेळी संघात सामील होऊ देत नाही,” क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले. "वॉर्नर भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेत दुखापतग्रस्त झालेल्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही आणि दुसऱ्या कसोटी सामन्यासाठीही उपलब्ध होणार नाही," त्यांनी पुढे म्हटले. “एबॉट भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघाच्या टूर सामन्यादरम्यान काल्फ दुखापतीतून मुक्त झाला आहे आणि बॉक्सिंग डे कसोटीच्या निवडीसाठी उपलब्ध झाला असता.” दरम्यान, वॉर्नरच्या अनुपस्थितीत जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड सलामीला येतील अशी अपेक्षा केली जात आहे.
दुसरीकडे, यापूर्वी पहिल्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली ज्यामुळे आता त्याला संपूर्ण मालिकेला मुकावे लागत आहे. शमीच्या जागी टीम इंडियाकडे नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज असे दोन नवखे पर्याय उपलब्ध आहेत.