IND vs AUS 2nd Test 2020: मेलबर्न कसोटीमध्ये टीम इंडिया ‘अजिंक्यच’, ‘या’ प्रमुख 5 कारणांमुळे भारताने मालिकेत केले दिमाखात पुनरागमन

नियमित कर्णधार विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेसाठी हा सामना कर्णधार म्हणून महत्वाचा होता, अशा स्थितीत आज आपण भारताच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयला कोणती 5 कारणे जबाबदार आहेत, ते पाहणार आहोत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test 2020: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेच्या अ‍ॅडिलेड ओव्हल येथील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियाने (Team India) अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वात मेलबर्न (Melbourne) कसोटी सामन्यात दणक्यात पुनरागमन केलं. MCG मधील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचमधील विजयासह टीम इंडियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली. टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळीने संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळत भारताने पहिल्या डावात 131 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात देखील गोलंदाजांनी आक्रामक कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा डाव 200 धावांवर संपुष्टात आणला. अशाप्रकारे भारताला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य मिळाले जे संघाने 2 विकेट गमावून गाठले. भारताच्या विजयात प्रभारी कर्णधार रहाणेने महत्वाची भूमिका बजावली. (IND vs AUS 2nd Test 2020: MCG मध्ये टीम इंडियाने मारली बाजी, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव करत मालिकेत 1-1ने केली बरोबरी)

शिवाय, भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती या सामन्यात अजिबात जाणवली नाही. अशा स्थितीत आज आपण भारताच्या दुसऱ्या वनडे सामन्यातील विजयला कोणती तीन कारणे जबाबदार आहेत, ते पाहणार आहोत.

1. अजिंक्य रहाणेचे नेतृत्व

विराटच्या अनुपस्थिती रहाणेने आपल्या नेतृत्व कौशल्याने सर्वांनाच प्रभावित केले. रहाणेच्या फिल्डिंग प्लेसमेंट, गोलंदाजीतील बदलांमुळे विशेषतः प्रभावित केले. या सर्वांमुळे एकही कांगारू फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही.

2. रहाणे-जडेजाची शतकी भागीदारी

कांगारू संघाचा पहिल्या डाव 195 धावांवर आटोपल्यावर टीम इंडियाच्या 131 धावांच्या आघाडीत रहाणे आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी भागीदारीने मोठी भूमिका बजावली. आघाडीचे आणि मधल्या फळीतील फलंदाज मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरल्यावर रहाणे आणि जडेजाने आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या तीनशेच्या जवळ पोहचवली. रहाणेने 112 तर जडेजाने 57 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात देखील रहाणेने संयमी फलंदाजी करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

3. गोलंदाजांचा भेदक मारा

मेलबर्न कसोटी सामन्यात एकीकडे ऑस्ट्रेलियन गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करत असताना भारतीय गोलंदाजांनी चांगली बॉलिंग केली आणि विरोधी संघातील अनुभवी फलंदाजांना हैराण करून सोडले. जसप्रीत बुमराह, आर अश्विन, नवोदित मोहम्मद शमी यांनी जबरदस्त गोलंदाजी करत कांगारू संघाच्या फलंदाजांना मोठा डाव खेळण्यापासून रोखले ज्यामुळे संघ मोठी धावसंख्या गाठू शकला नाही.

4. स्टिव्ह स्मिथचे अपयश

ऑस्ट्रेलियाचा नियमित सलामी फलंदाज डेविड वॉर्नरच्या अनुपस्थित स्मिथवर मधल्या फळीत धावसंख्या करण्याची मोठी जबाबदारी होती. मात्र, स्मिथने दोन्ही डावात फक्त 8 धावाच केल्या ज्यामुळे अन्य फलंदाजांवर दबाव वाढले जो ते सहन करू शकले नाही, परिणामी संघाला मोठी धावसंख्या करता आली ज्याचा फायदा भारताला झाला.

5. रहाणेची दुहेरी भूमिका

प्रभारी कर्णधार रहाणेवर यंदा नेतृत्वासह फलंदाज अशी दुहेरी भूमिका निभावण्याची जबाबदारी होती. रहाणेने आपल्या नेतृत्वाव्यतिरिक्त बॅटने देखील आश्वासक कामगिरी बजावली. पहिल्या डावात शतकी खेळीसह दुसऱ्या डावात मुंबईकर फलंदाज संघाच्या विजयात आघाडीवर राहिला. कांगारू फलंदाज मेलबर्नच्या खेळपट्टीवर संघर्ष करत असताना सामन्याच्या दोन्ही डावात मिळून सर्वाधिक रहाणेने धावा केल्या.

यासह भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आता तिसऱ्या कसोटी समन्यासाठी सिडनीसाठी काही दिवसांनी रावाना होतील. 7 जानेवारीपासून मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.