IND vs AUS 2nd T20I: दुसऱ्या टी-20 पूर्वी ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ; मिचेल स्टार्कची माघार, आरोन फिंचच्या समावेशावरही संभ्रम
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटरवरुन ही माहिती शेअर केली आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचच्या खेळण्यावरही संभ्रम बनलेले आहे.
IND vs AUS 2nd T20I: यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) आणि टीम इंडियात (Team India) आज सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydeny Cricket Ground) दुसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे, पण त्यापूर्वी कांगारू संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. सामन्याच्या काही वेळेपूर्वीच वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) उर्वरित दोन सामन्यातून माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या ट्विटरवरुन ही माहिती शेअर केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या म्हणण्यानुसार, स्टार्कच्या कुटुंबातील एक सदस्य आजारी असल्याने गोलंदाजाने माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टीन लँगर म्हणाले की, खेळाडूंसाठी कुटुंब हे खूप महत्वाचे आहे. ऑस्ट्रेलियन कोच पुढे स्टार्क बद्दल म्हणाले की जेव्हा तो इच्छितो तेव्हा संघात परत येऊ शकतो, आम्ही त्याचे स्वागत करू. स्टार्कने पहिल्या टी-20 सामन्यात 34 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. टी -20 मालिकेनंतर कांगारू संघाला 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचा पहिला कसोटी सामना 17 डिसेंबर रोजी अॅडिलेड येथे खेळला जाईल. (IND vs AUS 2nd T20I Probable Playing XI: दुसऱ्या टी-20 साठी असा असू शकतो टीम इंडियाचा प्लेइंग 11, 'हा' खेळाडू घेणार रवींद्र जडेजाचे स्थान)
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचच्या खेळण्यावरही संभ्रम बनलेले आहे. फिंचला शुक्रवारी पहिल्या टी-20 दरम्यान दुखापत झाली होती. 'Herald Sun' मधील एका अहवालानुसार फिंचला पहिल्या टी-20 दरम्यान हिप दुखापत झाली होती. आणि दुसऱ्या टी-20 फिंच खेळणार नसल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल संभव आहे. ऑस्ट्रेलियासाठी मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. शिवाय, अहवालात पुढे म्हटले की फिंच उपलब्ध नसल्यास त्याच्या जागी तब्बल दोन वर्षानंतर स्टिव्ह स्मिथ संघाचे नेतृत्व करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. हेराल्ड सनच्या अहवालानुसार मॅथ्यू वेड देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे, मात्र स्मिथ आघाडीचा पर्याय आहे.
कॅनबेरामध्ये पहिल्या दोन सामन्यानंतर संघ दुसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यासाठी सिडनीमध्ये जाईल. त्यानंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळली जाईल. पहिला सामना अॅडिलेड येथे आयोजित होणार असून दोन्ही संघातील पहिला दिवस/रात्र सामना असेल.