IND vs AUS 2nd T20I Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग व TV Telecast ची संपूर्ण माहिती
सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल.
IND vs AUS 2nd T20I Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा दुसरा सामना आज (रविवारी) सिडनी क्रिकेट मैदानावर (Sydney Cricket Ground) खेळला जाईल. पहिल्या टी-20 सामन्यात शानदार कामगिरी करत भारताने वर्चस्व गाजवले आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी पाहुणा भारतीय संघ (Indian Team( उत्सुक असेल. पहिल्या टी-20 मॅचमधील विजयाने भारताचा आत्मविश्वास उंचावला असेल तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात मिळवणे गरजेचे आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:40 वाजता सुरु होईल तर नाणेफेक 1:10 मिनिटांनी होईल. भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्स नेटवर्क आणि डीडी स्पोट्स वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIVवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. (T20I Squad: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतून रविंद्र जडेजा आऊट, Shardul Thakur इन)
टीम इंडियाने वनडे मालिका गमावली असली तरी टी-20 मधील त्यांची कामगिरी प्रभावी राहिली आहे. जर भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 9 पैकी ती चौथी मालिका ठरेल. ऑस्ट्रेलिया संघातील काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली आहे. डेविड वॉर्नरनंतर आता कर्णधार आरोन फिंचही दुखापतग्रस्त झाला आहे, त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर संशय बनले आहेत. फिंच आजच्या सामन्यात न खेळण्यास स्टिव्ह स्मिथवर फलंदाजीचा भार येईल. दुसरीकडे, मिचेल स्टार्कने देखील वैयक्तिक कारणामुळे उर्वरित दोन सामन्यातून माघार घेतली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळतील.
पाहा ऑस्ट्रेलिया आणि भारताचा टी-20 संघ
ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), सीन एबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवुड, मोइसेस हेनरिक्स, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डार्सी शॉर्ट आणि अॅडम झँपा.
भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि टी नटराजन.