IND vs AUS 2nd T20I: सिडनीमध्ये हार्दिक पांड्याचा धमाका! ऑस्ट्रेलियावर 6 विकेटने मात करत टीम इंडियाने मालिकेत मारली 2-0 ने बाजी 

कांगारू संघाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या बळावर टीम इंडियाने 19.4 ओव्हरमध्ये मनोरंजक विजय मिळवला. 

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd T20I: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) यांच्या सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने अष्टपैलू कामगिरी करत विजय मिळवला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. कांगारू संघाने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने 19.4 ओव्हरमध्ये मनोरंजक विजय मिळवला. भारतासाठी सलामी फलंदाज शिखर धवनने (Shikhar Dhawan) अर्धशतकी खेळी केली. धवन 52 धावा करून बाद झाला. विराटने 40 धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) नाबाद 42 धावा आणि श्रेयस अय्यरने नाबाद 12 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया सामना जिंकेल असे दिसत असताना हार्दिकने डेथ ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत संघाचा विजय निश्चित केला. दुसरीकडे, आजच्या 'करो या मरो'च्या सामन्यात कांगारू संघाने बॅट आणि नंतर चेंडूने दमदार कामगिरी बजावली, पण संघाला विजयीरेष ओलांडून देऊ शकले नाही. कांगारूंसाठी डॅनियल सॅम्स, अँड्र्यू टाय, मिचेल स्वीपसन आणि अ‍ॅडम झांपा यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd T20I: युजवेंद्र चहलची रेकॉर्डब्रेक कामगिरी, जसप्रीत बुमराहची बरोबरी करत भारताचा बनला नंबर 1 गोलंदाज)

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना धवन आणि केएल राहुलच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये 56 धावांची भागीदारी झाली असताना टायने राहुलला कॅच आऊट करत भारताला पहिला धक्का दिला. धवनने नंतर कॅप्टन कोहलीसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान धवनने अर्धशतक ठोकले, पण झांपाच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात धवन बाद होऊन माघारी परतला. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसनची देखील हाराकिरी झाली आणि स्वीपसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. कोहलीने चांगली सुरुवात केली, पण मोठ्या डावात त्याचे रूपांतर करू शकला नाही. सॅम्सने विराटला विकेटकीपर मॅथ्यू वेडकडे झेलबाद करत माघारी धाडलं.

दोन्ही संघातील मालिका बरोबरीत सुटल्याने अंतिम आणि निर्णायक तिसरा टी-20 सामना 8 नोव्हेंबर राय सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 ने जिंकली होती. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाने मालिकेतील दोन्ही सामने सिडनी क्रिकेट ग्राउंडवरच जिंकले होते.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif