IND vs AUS 2nd ODI: Ouch! आरोन फिंचच्या पोटावर आदळला नवदीप सैनीचा बाउन्सर, केएल राहुलने अशी घेतली मजा (Watch Video)
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एका क्षणाने चाहत्यांचे मन जिंकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा बाउन्सर चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू त्याच्या पोटावर आदळला. त्यानंतर भारतीय यष्टीरक्षक केएल राहुल आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी फिंचची फिरकी घेतली.
AUS Vs IND 2nd ODI: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात एका क्षणाने चाहत्यांचे मन जिंकले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) भारतीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचा (Navdeep Saini) बाउन्सर चेंडू खेळू शकला नाही आणि चेंडू त्याच्या पोटावर आदळला. त्यानंतर भारतीय यष्टीरक्षक केएल राहुल (KL Rahul) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी फिंचची फिरकी घेतली. या घटनेने भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांची मन जिंकली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही फिंच आणि भारतीय खेळाडूंची ही मजेदार शैली सोशल मीडियावर शेअर केली आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने दुसर्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा एकदा फिंच आणि डेविड वॉर्नरच्या जोडीने शतकी भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली आणि टीम इंडियाला मुश्किलीत पडले. (IND vs AUS 2nd ODI: आरोन फिंचचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, असा आहे दोन्ही संघाचा प्लेइंग इलेव्हन)
अलिकडच्या काळात दोन्ही संघात कित्येक विवादित आणि मजेदार क्षण शेअर केले आहेत, आयपीएलच्या आगमनानेही दोन्ही क्रिकेट दिग्गजांमधील संबंध बदलले आहेत; बरीच मैत्री आणि अधिक मजबूत बंध पाहायला मिळत आहे. आणि सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरु असलेल्या सामन्यात असाच एक क्षण पाहायला मिळाला जेव्हा सैनीचा चेंडू फिंचच्या पोटावर लागला. बॉल जेव्हा सैनीच्या हातातून सरकला आणि फिंचच्या पोटावर लागला तेव्हा ही घटना घडली. युजवेंद्र चहल आणि केएल राहुलने ऑस्ट्रेलियन कर्णधाराकडे चौकशी करण्यासाठी धाव घेतली. पाहा व्हिडिओ:
आपल्या पोटाला गंभीरपणे दुखापत होऊ नये यासाठी आपल्याकडे भरपूर नैसर्गिक पॅडिंग आहे असे फिंचने सांगून स्वत:ची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला असतानाच सैनीने आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, अजित आगरकर आणि क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले या ऑनलाईन टीकाकारांनी सामान्यत: एकमेकांविरूद्ध खडतर खेळासाठी ओळखल्या जाणाऱ्या दोन्ही संघात खूप मैत्री दिसत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शिवाय, दुसर्या वनडे सामन्यात फिंचने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नर-फिंचच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला पुन्हा शीर्षस्थानी पोहचवले असून यजमान टीम बोर्डवर 300 पेक्षा जास्त धावसंख्या करण्याच्या प्रयत्नात असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)