IND vs AUS 2nd Test: टीम इंडियाचे 'हे' 3 महारथी दुसऱ्या टेस्टमध्ये संघाला बनवू शकतात विजयी, ऑस्ट्रेलियाची वाढू शकते डोकेदुखी

पहिल्या सामन्यात लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियापुढे आता मालिकेत पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान आहे. बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे जे ऑस्ट्रेलियाला आव्हान देत संघाला विजय मिळवून देऊ शकतात.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs AUS 2nd Test: ख्रिसमसच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 26 डिसेंबरपासून भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना खेळला जाणार आहे. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणानिमित्त मायदेशी परतला आहे, त्यामुळे त्याच्या जागी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचे नेतृत्व करेल. अ‍ॅडिलेड ओव्हल येथील पहिल्या सामन्यात लज्जास्पद पराभवानंतर टीम इंडियापुढे (Team India) आता मालिकेत पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान आहे. पहिल्या टेस्ट मॅचमधील फलंदाजांनी केलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर संघ मेलबर्नमधील दुसऱ्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल करण्याची शक्यता आहे. रहाणेच्या नेतृत्वात संघाला त्यांचा फलंदाजीक्रम मजबूत करण्याची गरज आहे. पहिल्या डावात 244 धावा करणारा भारतीय संघ दुसऱ्या डावात 36 धावाच करू शकला. (IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट लढतीआधी टीम इंडियाची कसून मेहनत, ‘हा’ युवा फलंदाज दिसला सराव करताना, पहा Photos व Video)

बॉक्सिंग डे टेस्ट मॅचमध्ये टीम इंडिया युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे जे ऑस्ट्रेलियाला आव्हान देत संघाला विजय मिळवून देऊ शकतात.

1. शुभमन गिल

पृथ्वी शॉ पहिल्या टेस्टमधील दोन्ही डावात मिळून एकूण 4 धावत करू शकला. शिवाय, फिल्डिंगमधेही त्याने प्रभावित केले नाही त्यामुळे पृथ्वीच्या जागी आता शुभमन गिलला संधी मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. शुभमन आणि मयंक अग्रवालची जोडी अधिक काळ खेळपट्टीवर टिकून राहिल्यास कांगारू गोलंदाजांवर दबाव निर्माण होऊ शकतो शिवाय संघाला चांगली सुरुवात करून दिल्यास संघ मोठी धावसंख्या उभारू शकते.

2. अजिंक्य रहाणे

नियमित कर्णधार विराटच्या अनुपस्थितीत रहाणेवर संघाचे प्रभावी नेतृत्व करण्याची जबाबदारी असेल. 2014-15 च्या एमसीजीवर खेळल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये रहाणेने 147 धावांचा तुफानी डाव खेळला होता. शिवाय, पहिल्या सामन्यात देखील त्याने 42 धावांची खेळी केली होती, पण मोठ्या डावात त्याचे रूपांतर करू शकला नाही. अशा स्थितीत रहाणे यंदा तरी आक्रमकपणे बॅटने टीमचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात असेल.

3. जसप्रीत बुमराह

मोहम्मद शमीच्या अनुपस्थिती बुमराहवर मुख्य वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावण्याची मोठी जबाबदारी असेल. बुमराहने 2018/19 दौऱ्यावर मेलबर्न ग्राउंडवर 33 धावांवर 6 विकेट घेतल्या होत्या. बुमराहने पहिल्या मॅचमधेही 2 विकेट करत सलामी जोडीला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीवर दबाव आणला होता, त्यामुळे बुमराहकडून पुन्हा त्याच कामगिरीची अपेक्षा असेल.