IND vs AUS T20I 2020-21: टीम इंडियासाठी 'हे' खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज, ठरू शकतात गेमचेंजर

शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी कॅनबेरा येथे 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु होणार आहे. टी-20 मालिकेत भारतीय संघातील खेळाडू पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज. हे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत गेमचेंजरची भूमिका बजावू शकतात.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे (Photo Credit: PTI)

IND vs AUS T20I 2020-21: तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) आता क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटमध्ये आमने-सामने येणार आहे. शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी कॅनबेरा (Canberra) येथे 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरु होणार आहे. पुढील दोन सामने सिडनी क्रिकेट मैदानावर 6 आणि 8 डिसेंबर रोजी खेळले जातील. यापूर्वी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने 2-1ने विजय मिळवला. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले तर टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंड दौऱ्यावर मालिकेत व्हाईट-वॉश पत्करावा लागला होता. नुकत्याच संपुष्टात आलेल्या वनडे मालिकेच्या पहिल्या दोन समन्याय भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली असली तरी तिसरी सामन्यात क्लीन स्वीप टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघासाठी (Indian Team) गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करून विजय मिळवून दिला. (भारताकडून 2020 मध्ये ODI सामन्यांत 'या' गोलंदाजाने काढल्या सर्वाधिक विकेट्स, पाहा थक्क करणारे आकडे)

4 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेत भारतीय संघातील खेळाडू पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज. हे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत गेमचेंजरची भूमिका बजावू शकतात.

विराट कोहली: टीम इंडियाचा कर्णधार टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शिवाय, कोहलीने भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मधेही 16 सामन्यात सर्वाधिक 584 धावांची नोंद केली आहे. विराटने मागील दोन्ही वनडे सामन्यात अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे टी-20 मालिकेत त्याचा फॉर्म महत्वाचा ठरणार आहे.

हार्दिक पांड्या: वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचे पुढील लक्ष्य आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोट्या फॉरमॅटवर असेल. आयपीएल 2020 मध्येही त्याने छाप पडली असल्याने टी-20 मालिकेत हार्दिक आपला फॉर्म कायम ठेवेल अशा टीम इंडियाला आशा असेल.

केएल राहुल: केएल राहुल टी-20 मालिकेत डावाची सुरुवात करणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. राहुलने आयपीएल 2020मध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली आणि आता एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर यष्टीरक्षक-फलंदाज भारताला टी-20 मालिकेत पुनरागमन करून देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

जसप्रीत बुमराहः वेगवान गोलंदाज चेंडूने गेमचेंजर ठरू शकतो. बुमराहने टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट काढल्या आहेत. बुमराहने आयपीएलने दुसऱ्या सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. पॉवर-प्लेमधेही त्याने प्रभावी कामगिरी बजावली होती, त्यामुळे आगामी मालिकेत टीमला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.

शिखर धवन: आयपीएलमध्ये सलग दोन शतक करणारा धवन पुन्हा एकदा सलामीला येत मोठा स्कोर करण्याच्या तयारीत असेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीमला धवनकडून मोठ्या प्रभावी सुरुवातीची अपेक्षा असेल.

एकदिवसीय मालिकेच्या यशस्वी कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिकेचे आयोजन करणार आहे. सामने एकदिवसीय मालिकेच्या ठिकाणी खेळले जातील आणि पुन्हा एकदा चाहते स्टेडियमवर सामन्यांचा आनंद लुटू शकतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif