IND vs AUS 2020-21: स्टीव्ह वॉ यांचा ऑस्ट्रेलिया संघाला सल्ला; भारतीय संघाच्या 'या' फलंदाजाला 'स्लेज' करू नका, नाहीतर पडेल भारी!
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी संघाला चेतावणी दिली आहे. वॉ यांनी म्हटले की भारताचा कर्णधार चांगली कामगिरी करण्यास प्रेरित होऊ शकेल म्हणून ऑस्ट्रेलियाने त्याला स्लेज करण्यापासून टाळावे.
IND vs AUS 2020-21: भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यासाठी तीन आठवड्यांहून कमी वेळ राहिल्यामुळे सर्व भारतीय चाहत्यांची नजर विराट कोहली (Virat Kohli) आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार काय योजना करत असेल यावर असणार असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताच्या मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) संघाने विक्रमी कामगिरी करत 71 वर्षात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्या घरात पराभूत करून कसोटी मालिका जिंकली होती. मात्र, यंदा डेविड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) पुनरागमनानंतर ही कसोटी बरीच कठोर होईल. वॉर्नर आणि स्मिथवरील बंदीमुळे 2018-19 च्या ऑस्ट्रेलियन संघात सामील होऊ शकले नाही. शिवाय, यंदाच्या द्विपक्षीय मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांनी संघाला चेतावणी दिली आहे. विराटचा फॉर्म बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या बचावात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली जाते असे वॉ यांचे मत आहे. (Rohit Sharma Injury Update: रोहित शर्मा याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे मोठे विधान)
वॉ यांनी म्हटले की भारताचा कर्णधार चांगली कामगिरी करण्यास प्रेरित होऊ शकेल म्हणून ऑस्ट्रेलियाने त्याला स्लेज करण्यापासून टाळावे. “स्लेडिंगमुळे विराट कोहलीची चिंता करण्याची गरज नाही, हे महान खेळाडूंविरुद्ध काम करत नाही आणि त्या लोकांना एकटे सोडावे. मला वाटते की कोणतीही अतिरिक्त प्रेरणा त्याला अधिक धावा मिळवून देईल. म्हणून तुम्ही त्याला जास्त बोलू नये,” वॉ यांनी ESPNcricinfoवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले. ऑस्ट्रेलिया-भारतीय संघात डिसेंबर-जानेवारी महिन्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. 2018/19 च्या दौऱ्यादरम्यान भारताने ऑस्ट्रेलियाचे दारुण पराभव केला आणि कांगारू संघाला त्यांच्या घरात पराभूत करणारा पहिला आशियाई संघ बनला. या मालिकेत फलंदाज चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, कोहली आणि जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांनी शानदार कामगिरीत बजावली होती.
वॉ यांनी पुढे म्हटले की, “कोहली एक जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. त्याला मालिकेचा सर्वात प्रभावी फलंदाज म्हणून काम करायचे असेल. गेल्या वेळी, तो आणि स्मिथ भारतात एकमेकांच्या विरोधात आले, तीन शतकांसह स्मिथचे वर्चस्व होते आणि कोहलीला फारसे काही मिळाले नाही. शेवटच्या वेळी स्मिथने त्याला मागे टाकले हे त्याच्या मनात असेल. त्यामुळे त्याला बऱ्याच धावा करायच्या असतील आणि जर असे केले तर भारताच्या जिंकण्याची दाट शक्यता आहे.”