IND vs AUS 2020-21: मुलीला रुममध्ये खेळव! अजिंक्य रहाणेने सुट्टीच्या दिवशी बॅटिंग प्रॅक्टिस करण्याचा शोधला अनोखा मार्ग, पाहून शिखर धवनने केले ट्रोल

रताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकॉउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात हो आपल्या हॉटेल रुममध्ये सराव करताना दिसत आहे. रहाणेचा हा व्हिडिओ पाहून शिखर धवनला हसू अनावर झाले आणि प्रयुत्तर म्हणून रहाणेला ट्रोल केलं.

अजिंक्य रहाणेचा हॉटेल रूममध्ये सराव (Photo Credit: Instagram)

India Tour of Australia 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) आव्हानात्मक दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियातील (Team India) सर्व खेळाडू कसून मेहनत करत आहे. जिममध्ये घाम गाळण्यापासून मैदानावर सराव करण्यापर्यंत भारतीय खेळाडूला स्वतःला ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार करत आहेत. बहुप्रतीक्षित मालिका 27 नोव्हेंबर रोजी वनडे मालिकेने सुरु होईल. भारतीय क्रिकेटपटू अजूनही सिडनीमध्ये (Sydney) 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहेत, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या जैव बबलमध्ये घराबाहेर प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. इतकंच नाही तर भारतीय क्रिकेटपटूंनी युएईहून ऑस्ट्रेलियामध्ये पोहचल्यावर एका दिवसानंतर मैदानी प्रशिक्षण सुरू केले. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकॉउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात हो आपल्या हॉटेल रुममध्ये सराव करताना दिसत आहे. रहाणेचा हा व्हिडिओ पाहून शिखर धवनला (Shikhar Dhawan) हसू अनावर झाले आणि प्रयुत्तर म्हणून रहाणेला ट्रोल केलं. (IND vs AUS 2020-21: टीम इंडियाला जाणवू शकते रोहित शर्माची कमतरता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हिटमॅन'चे 'हे' धोकादायक आकडे देतात साक्ष)

रहाणेने स्वत: च्या हॉटेलच्या खोलीत फलंदाजीचा सराव करतानाचा एक व्हिडिओ शायर केला आणि पोस्टला कॅप्शन देत म्हटले की, “सरावासाठी आज सुट्टी म्हणजे मला फलंदाजी करण्याचा इतर मार्ग सापडला. जास्त काळ माझ्या फलंदाजीपासून दूर राहू शकत नाही. क्षमस्व शेजारी”. यावर धवनने मजेदार प्रतिक्रिया देत कसोटी संघाच्या उपकर्णधाराला ट्रोल केले. "भावा मानलं तुला, एक दिवसाआधी सराव सामना खेळला. त्यात 50 मारले, या प्रॅक्टिसने काय फायदा? मुलीला खेळ रुममध्ये भावा." पाहा रहाणेच्या अनोख्या सरावाचा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

पाहा धवनची प्रतिक्रिया...

धवनची प्रतिक्रिया (Photo Credit: Instagram)

17 डिसेंबर रोजी अ‍ॅडिलेड येथे सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत रहाणे ऑस्ट्रेलियन गोलंदाजांविरुद्ध धोकादायक ठरु शकतो. रहाणे आपल्या मोठ्या आणि मजबूत फलंदाजीसाठी ओळखला जातो. उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहली भारतात परत जाण्यापूर्वी डे-नाईट कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल. अंतिम तीन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने अद्याप भारतीय कर्णधारपदाची घोषणा केली नसली तरी उपकर्णधार रहाणे कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करण्यासाठी मुख्य दावेदार मानला जात आहे.