IND vs AUS 2020-21: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मालिकेत रोहित-इशांतच्या खेळण्यावर संभ्रमाचं वातावरण; रवि शास्त्री यांच्या ट्विटनंतर श्रेयस अय्यरच्या नावाला उधाण

रोहित शर्माची तंदुरुस्तीची समस्या लक्षात घेता श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार असल्याचा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. शिवाय मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या नुकत्याच ट्विटवरून अय्यर कसोटी संघात पदार्पण करू शकतो असे दिसत आहेत.

रोहित शर्मा, रवि शास्त्री आणि श्रेयस अय्यर (Photo Credits: Getty Images/Twitter)

IND vs AUS 2020-21: नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2020 मध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) शानदार फॉर्ममध्ये होता आणि त्याने 17 सामन्यात 519 धावा केल्या. श्रेयसने आपल्या कौशल्यांनी सर्वांना प्रभावित केले आणि आपल्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. श्रेयस अय्यर सध्या भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour of Australia) आहे जिथे तो टीम इंडियाच्या (Team India) मर्यादित ओव्हर संघाचा भाग आहे. पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहलीची अनुपस्थिती आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) तंदुरुस्तीची समस्या लक्षात घेता श्रेयस ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार असल्याचा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. शिवाय मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्या नुकत्याच ट्विटवरून अय्यर कसोटी संघात पदार्पण करू शकतो असे दिसत आहेत. मंगळवारी शास्त्री यांनी ट्विटरवर अय्यरसोबत फोटोचे कोलाज अपलोड केले जिथे दोघेही संभाषणात सामील झालेले दिसत आहेत. शास्त्री यांनी एक मजेदार कॅप्शन देखील पोस्ट केले आहे ज्यामध्ये त्याने खुलासा केला आहे की दोघे एकच शाळा आणि महाविद्यालयात शिकले आहेत. (IND vs AUS 2020-21: रोहित आणि इशांत शर्मा यांना प्रशिक्षक रवि शास्त्री यांचा अल्टीमेटम, 3-4 दिवसांत ऑस्ट्रेलिया पोहचण्याची दिली ताकीद)

आयपीएल दरम्यान शास्त्री यांनी कोलकाताविरुद्ध एका सामन्यात केलेल्या कामगिरीबद्दल मोहम्मद सिराजच्या प्रशंसेचे एक ट्विट पोस्ट केले होते. काही दिवसांनंतर, सिराजची आगामी दौर्‍यासाठी भारतीय संघात निवड झाली. रोहित अद्यापही बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतसराव करत आहे अशा स्थितीत 'हिटमॅन' वेळेवर ऑस्ट्रेलियाला पोहचेल की नाही यावर संभ्रमाचं वातावरण बनले आहे. पाहा रवि शास्त्री यांचे ट्विट:

दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2020 दौरा शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडिया तीन वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर तितक्याच टी-20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 सामना कॅनबेरा आणि सिडनी येथे खेळला जाईल. कोहली मर्यादित षटकांच्या मालिकेत तसेच चार कसोटी सामन्यांपैकी पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार असेल. बीसीसीआयने विराटची पितृत्व रजा मंजूर केल्यामुळे कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या तीन कसोटी सामन्यांना मुकणार आहे.