IND vs AUS 2020-21: Cameron Green याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केएल राहुलने असे केले स्वागत, पाहून ऑस्ट्रेलियन फलंदाजही राहिला अवाक, पाहा Video

कॅमेरूनने सामन्यानंतर सांगितले की जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल त्याला काय म्हणाला. राहुलचा जेस्चर पाहून तो स्वतःदेखील अवाक झाला असल्याचं ग्रीनने कबूल केलं.

कॅमेरून ग्रीन (Photo Credit: Instagram/ICC)

IND vs AUS 2020-21: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपुष्टात अली आहे. या मालिकेचा शेवटचा सामना बुधवारी कॅनबेरा (Canberra) येथे खेळला गेला, जो भारताने 13 धावांनी जिंकला आणि ऑस्ट्रेलियाने मालिका 2-1 अशी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी कॅमरून ग्रीन (Cameron Green) तर भारताकडून टी नटराजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले. कॅमेरूनने 27 चेंडूत 21 धावा केल्या. कॅमेरूनने सामन्यानंतर सांगितले की जेव्हा तो फलंदाजीला आला तेव्हा टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) त्याला काय म्हणाला. राहुलचा जेस्चर पाहून तो स्वतःदेखील अवाक झाला असल्याचं ग्रीनने कबूल केलं. ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणारा ग्रीन म्हणाला की, जेव्हा तो फलंदाजी आला तेव्हा तो घाबरलेला होता, परंतु राहुलने असे काही शब्द सांगितले जेणेकरून युवा फलंदाजाचे आत्मविश्वास वाढवला. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर आजवर अनेक वाद, स्लेजिंगच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत, पण ही घटनेने सर्वांचे मन जिंकले. (IND vs AUS T20I 2020-21: टीम इंडियासाठी 'हे' खेळाडू मैदान गाजवण्यास सज्ज, ठरू शकतात गेमचेंजर)

ग्रीनने म्हटले, “स्टम्पच्या मागे केएल राहुल एकदम शानदार आहे. त्याने मला विचारले की मी नर्व्हस आहे की नाही आणि मी फक्त ‘हो, मी थोडा नर्व्हस आहे’ असे उत्तर दिले. तो म्हणाला ‘हो, चांगला कर यंगस्टर,’ असा त्याने प्रतिसाद दिला. त्यामुळे मी खरोखर अवाक झालो.” ग्रीन ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा 230वा खेळाडू ठरला. माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथकडून त्याची कॅप मिळाल्यानंतर ग्रीनने चार ओव्हर गोलंदाजी केली ज्यामध्ये त्याने 27 धावा दिल्या पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. ग्रीनने 5व्या स्थानावर फलंदाजी केली आणि 27 चेंडूत एक चौकार आणि षटकारासह 21 धावा केल्या. ग्रीनला वाटले की त्याला थोडी प्रतिकूल स्वागतार्हता मिळेल, म्हणूनच राहुलच्या हावभावामुळे त्याला आश्चर्य वाटू लागले. 21-वर्षीय म्हटले की राहुलचे जेस्चर नेहमीच त्याला लक्षात राहील.

ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते. तिसरा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया आता टी-20 मालिकेत वाढीव आत्मविश्वासाने मैदानावर उतरेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 डिसेंबरपासून तीन सामन्यांची टी -20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळली जाणार आहे. यानंतर दोन्ही देशात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची आयोजित केली जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif