IND vs AUS 1st Test: अॅडिलेड टेस्ट मॅचमधील विजय कोहलीला बनवणार ऑस्ट्रेलियातील 'विराट' आशियाई कर्णधार, वाचा सविस्तर
आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या डे-नाईट कसोटी सामन्यात भारताने यजमानांचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियामध्ये दोनपेक्षा जास्त कसोटी सामने जिंकणारा कोहली पहिला आशियाई कर्णधार बनू शकतो.
IND vs AUS 1st Test: अॅडिलेड ओव्हल (Adelaide Oval) येथे आजपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने (India) पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. आजपासून सुरु झालेल्या टेस्ट मालिकेचा पहिला सामना खेळत टीम इंडिया (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मायदेशी परतणार आहे, त्यामुळे संघाला मालिकेत विजयी सुरुवात करून देण्याचा त्याचा निर्धार असेल. आणि असे केल्या तो ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) आशियाचा यशस्वी कारण्याधार बानू शकतो. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या (Border-Gavaskar Trophy) डे-नाईट कसोटी सामन्यात भारताने यजमानांचा पराभव केल्यास ऑस्ट्रेलियामध्ये दोनपेक्षा जास्त कसोटी सामने जिंकणारा कोहली पहिला आशियाई कर्णधार बनू शकतो. कोहलीला या विक्रमला गवसणी घालण्यासाठी मात्र मिळेल कारण पहिल्या सामन्यानंतर तो पॅटर्निटी रजेवर जनावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या 2018-19 दौऱ्या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा कोहली हा पहिला आशियाई कर्णधार बनला होता. अॅडलेड येथे पहिली कसोटी आणि मेलबर्नमधील तिसरी कसोटी जिंकून 'विराटसेने'ने डाऊन अंडरमध्ये इतिहास रचला होता. (IND vs AUS 1st Test: विराट कोहलीच्या रडारवर सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग यांचे विक्रम; माजी Aussie कर्णधाराला पछाडत वर्ल्ड रेकॉर्डची संधी)
दरम्यान, कोहलीने भारताचा माजी कर्णधार बिशन सिंह बेदी आणि माजी पाकिस्तानी कर्णधार मुश्ताक मोहम्मद यांच्यासह ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी 2 विजय मिळवले आहेत. दोन्ही माजी खेळाडूंनी 5 कसोटी सामन्यात 2 विजय नोंदवले होते तर कोहलीने 6 सामन्यांत समान कामगिरी केली आहे. बेदी यांच्या भारतीय संघाने 1977-78 डाऊन अंडर दौऱ्यावर 5 सामन्यांच्या मालिकेच्या तिसर्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता तर 1977 सिडनी कसोटी आणि 1979 मेलबर्न कसोटीत मुश्ताक मोहम्मदच्या पाकिस्तान संघाने विजय नोंदविला. दुसरीकडे, विराट पहिल्या कसोटी सामन्यात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या जादुई आकड्यांनाही मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे.
पॉन्टिंग आणि कोहलीने कर्णधार म्हणून प्रत्येकी 41 आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत, त्यामुळे पहिल्या डे/नाईट सामन्यात एक शतक आणि विराट पॉन्टिंगला मागे टाकत नंबर-1 कर्णधार बनेल. याशिवाय, विराट पॉन्टिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांचीही बरोबरी करेल. दरम्यान, विराट आणि सचिनने डाऊन अंडर सर्वाधिक 6 शतकं करण्याचा मान मिळवला आहे, पण ऑस्ट्रेलियामध्ये आणखी एक शतक विराटला सचिनच्या पुढे नेईल.