IND vs AUS 1st Test Day 1: ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीपुढे भारत बॅकफूटवर, लंचपर्यंत भारताचा स्कोर 2/41
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्ससह वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजांनी टिचून मारा केला आणि लंचपर्यंत भारताच्या सलामी जोडीला माघारी धाडलं. लंच ब्रेकपर्यंत भारताने 2 गडी गमावत 41 धावा केल्या आहेत. आतापर्यंत 25 षटकांचा खेळ झाला आहे.
IND vs AUS 1st Test Day 1: भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातलं पहिलं सत्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नावावर राहीलं. मिचेल स्टार्क (Mitchell Starc), पॅट कमिन्ससह (Pat Cummins) वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजांनी टिचून मारा केला आणि लंचपर्यंत भारताच्या सलामी जोडीला माघारी धाडलं. लंच ब्रेकपर्यंत भारताने 2 गडी गमावत 41 धावा केल्या आहेत. आतापर्यंत 25 षटकांचा खेळ झाला आहे तर चेतेश्वर पुजारा नाबाद 17 आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 5 धावा करून क्रीजवर पाय रोवून खेळत आहेत. स्टार्क आणि कमिन्स यांना आतापर्यंत प्रत्येक 1 विकेट मिळाल्या. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये संघाला धक्का बसला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिला कसोटी सामना गुलाबी चेंडूने अॅडिलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. (IND vs AUS 1st Test: अॅडिलेड टेस्ट मॅचमधील विजय कोहलीला बनवणार ऑस्ट्रेलियातील 'विराट' आशियाई कर्णधार, वाचा सविस्तर)
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाची अॅडिलेडमध्ये खराब सुरुवात झाली. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ यांची जोडी सलामीला आली. पण स्टार्क ओव्हरच्या दुसऱ्याच चेंडूवर शॉची दांडी गुल केली आणि भारतीय फलंदाजाला भोपळा फोडू न देता माघारी धाडलं. चेतेश्वर पुजारासोबत मयंक डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत असताना कमिन्सने संघाला आणखी एक धक्का दिला आणि मयंकचा त्रिफळा उडवला. मयंकने 17 धावा केल्या. लंचपर्यंत पुजारा आणि कर्णधार कोहलीने आपली विकेट सांभाळत स्कोर 2 बाद 41 धावांपर्यंत नेला.
भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्यांदाच पिंक बॉलने कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. यापूर्वी दोन देशांदरम्यान एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-1 ने जिंकली, तर टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. 2018-19 दौर्यावर झालेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव करत इतिहास रचला होता. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप अंतर्गत खेळली जात आहेत. गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर तर भारतीय संघ दुसर्या क्रमांकावर आहे.