IND vs AUS 1st ODI: आरोन फिंचने जिंकला टॉस, ऑस्ट्रेलियाचा पहिले फलंदाजीचा निर्णय; रोहित शर्माच्या जागी मयंक अग्रवाल सलामीला

तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील पहिले दोन वनडे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळले जातील.

विराट कोहली आणि आरोन फिंच (Photo Credits: Facebook)

IND vs AUS 1st ODI: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील लढाईला आजपासून सुरवात होत आहे. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय संघातील पहिले दोन वनडे सामने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) खेळले जातील. 1992 मध्ये कांगारूविरुद्ध वर्ल्ड कपमधील नेव्ही ब्लू जर्सीमध्ये भारतीय संघ (Indian Team) दिसणार आहे. नवीन जर्सी आणि कोरोना काळात ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज टीमविरुद्ध भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने लक्षवेधी प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma) संपूर्ण वनडे आणि टी-20 मालिकेला मुकणार आहे. अशा स्थितीत आजच्या सामन्यासाठी भारताकडून शिखर धवनसोबत मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) सलामीला येईल तर श्रेयस अय्यर चौथ्या आणि केएल राहुल (KL Rahul) मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसेल. राहुल फलंदाज आणि विकेटकीपरची भूमिका बजावेल. (IND vs AUS 1st ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या ऑनलाईन स्ट्रीमिंग आणि TV Telecast ची संपूर्ण माहिती)

दुसरीकडे, आजच्या सामन्यात विजय मिळवून यजमान ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत आघाडी घेण्याचे आव्हान असेल, त्यामुळे कांगारू संघाने मजबूत प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. डेविड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच डावाची सुरुवात करतील, तर स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या आणि मार्नस लाबूशेन चौथ्या स्थानावर फलंदाजी करेल. ऑस्ट्रेलियाने संघात ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोइनिस अशा दोन अष्टपैलू खेळाडूंना स्थान दिले आहे. अ‍ॅलेक्स कॅरी/मॅथ्यू वेड संघाचा विकेटकीपर असेल.

पाहा ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचा प्लेइंग इलेव्हन

ऑस्ट्रेलिया टीम: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड/अ‍ॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झांपा आणि जोश हेझलवूड.

भारतीय टीम: मयंक अग्रवाल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि युजवेंद्र चहल.