IND Playing XI vs SA 1st T20I: विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर टीम इंडिया कोण IN, कोण OUT? पहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघाला माजी कर्णधार विराट कोहली, सर्व फॉर्मेट कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या प्रमुख खेळाडूंची उणीव भासेल कारण वरिष्ठ सदस्यांना आयपीएल 2022 नंतर ब्रेक देण्यात आला आहे.
IND vs SA 1st T20I: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका उद्यापासून म्हणजेच 9 जूनपासून दिल्लीत सुरू होत आहे. या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचे दडपण असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात पहिल्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (India Playing XI) मोठे बदल होणार आहेत. उद्या पहिल्या टी-20 सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह भारतीय संघ मैदानात उतरेल यावर एक नजर टाकूया. (IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध Rohit Sharma च्या अनुपस्थितीने उठवले प्रश्न, प्रशिक्षक द्रविडने आपल्या उत्तराने केली बोलती बंद)
1. सलामी जोडी
एक मोठी युक्ती खेळत ईशान किशनला केएल राहुलचा नवा सलामी जोडीदार म्हणून मैदानात उतरवेल. किशन भारतासाठी टी-20 मालिका स्वबळावर जिंकू शकतो. तसेच तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील आहे. धोकादायक फलंदाजीसोबतच किशन एक निष्णात यष्टिरक्षकही आहे. रोहित शर्मा या संपूर्ण टी-20 मालिकेतून बाहेर आहे, अशा परिस्थितीत ईशान कर्णधार राहुलसोबत सलामीला उतरेल. ईशान किशन क्रीझवर येताच तो सर्वात मोठ्या गोलंदाजावर हल्लाबोल करण्यासाठी ओळखला जातो.
2. मध्य क्रम
विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या टी-20 मालिकेत खेळत नसल्याने त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला संधी मिळणे अपेक्षित आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला अष्टपैलू हार्दिक पंड्या चौथ्या क्रमांकावर तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे. फिनिशर म्हणून दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. दिनेश कार्तिकने आयपीएल 2022 च्या 16 सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी 55 च्या सरासरीने आणि 183.33 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या आहेत. यानंतर अक्षर पटेल 7व्या क्रमांकावर खेळेल.
3. हे असतील फिरकी आणि वेगवान गोलंदाज
युझवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई फिरकी गोलंदाजी करतील. तर टीम इंडिया पहिल्या टी-20 मध्ये हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांसोबत उतरू शकते. तसेच अष्टपैलू हार्दिक पांड्या हा तिसरा वेगवान गोलंदाजीचा पर्याय उपलब्द करून देतो.