IND A vs IND D, Duleep Trophy 2024 3rd Match Day 1 Stumps Scorecard: पहिल्या दिवसाचा खेळ संपला, शम्स मुलाणीच्या शानदार खेळीमुळे भारत ड संघाने केल्या 288 धावा; येथे पाहा स्कोअरकार्ड
शम्स मुलानी 88 आणि खलील अहमद 15 धावांसह खेळत आहेत.
India A vs India D, Duleep Trophy 2024 Day 1 Stumps Scorecard: दुलीप ट्रॉफी 2024 चा (Duleep Trophy 2024) तिसरा सामना आजपासून भारत अ विरुद्ध भारत ड यांच्यात अनंतपूर येथील ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांना मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. हा सामना जिंकून दोन्ही संघांना विजयाची चव चाखायला आवडेल. पहिल्या दिवसाचा खेळ संपला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारत अ संघाने 82 षटकांत 8 गडी गमावून 288 धावा केल्या आहे. शम्स मुलानी 88 आणि खलील अहमद 15 धावांसह खेळत आहेत.
तत्पूर्वी, भारत डी संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील भारत अ ने दुलीप ट्रॉफी 2024 च्या फेरी -2 मध्ये भारत डी विरुद्ध खराब सुरुवात केली. (हे देखील वाचा: Ishan Kishan Century: दुलीप ट्रॉफीमध्ये इशान किशनचे दमदार पुनरागमन, आपल्या स्फोटक शतकाने टीकाकारांना दिले चोख प्रत्युत्तर)
भारत अ संघाकडून शम्स मुलानीने सर्वाधिक नाबाद 88 धावांची खेळी केली. आपल्या या शानदार खेळीत शम्स मुलानीने तीन षटकार आणि चार चौकार लगावले. शम्स मुलानी व्यतिरिक्त तनुष कोटियनने 53 धावा केल्या. भारत अ संघाकडून हर्षित राणा, विधाथ कावरप्पा आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हर्षित राणा, विधाथ कावरप्पा आणि अर्शदीप सिंग यांच्याशिवाय सरांश जैन आणि सौरभ कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.