IND-A vs AUS-A 2nd Tour Match: भारतीय गोलंदाजांचा झंझावात, दिवस/रात्र सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर; भारताला 86 धावांची आघाडी
भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ संघात तीन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली. दिवसाखेर ऑस्ट्रेलिया 108 धावांवर ऑलआऊट झाला. यासह भारताला पहिल्या डावाच्या आधारावर 87 धावांची आघाडी मिळाली आहे. जसप्रीत बुमराहच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर संघाने 194 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली.
IND-A vs AUS-A 2nd Tour Match: 17 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी (Border-Gavaskar Trophy) भारत-अ (India-A) आणि ऑस्ट्रेलिया-अ (Australia-A) संघात तीन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली. दिवस/रात्र सराव सामन्यात अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला पण फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नाबाद अर्धशतकी खेळीच्या बळावर संघाने 194 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली. तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन फलंदाजही भारतीय गोलंदाजांपुढे फेल ठरले. दिवसाखेर ऑस्ट्रेलिया 108 धावांवर ऑलआऊट झाला. यासह भारताला पहिल्या डावाच्या आधारावर 87 धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार अॅलेक्स कॅरी 32 धावा आणि पॅट्रिक रोवे नाबाद 6 धावा करून परतला. भारताकडून मोहम्मद शमी (Mohammed Shami) , नवदीप सैनी (Navdeep Saini) आणि बुमराहने चूक मारा करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना मुश्किलीत टाकले. शमी आणि सैनीने प्रत्येकी 3, बुमराहने 2 तर मोहम्मद सिराजला 1 विकेट मिळाली. (IND-A vs AUS-A 2nd Tour Match: जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सराव सामन्यात ठोकले प्रथम श्रेणीतील पहिले अर्धशतक)
आजच्या सामन्यात भारतासाठी पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल सलामीला आले. पण मयंक 2 धावा करून स्वस्तात परतला. त्यानंतर पृथ्वी 40 आणि शुभमन गिलने 43 धावा करत डाव सावरला. कर्णधार अजिंक्य रहाणे देखील फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा देखील अपयशी ठरले. अशा स्थितीत बुमराह संघाच्या मदतीला धावला. बुमराह फक्त 57 चेंडूत 55 धावांवर नाबाद परतला. बुमराहने आपल्या कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकत टीम इंडियाचा डाव हाताळला आणि संघाला सन्माननीय धावसंख्या मिळवून दिली. मोहम्मद सिराजने 22 धावा केल्या. बुमराह आणि सिराजमध्ये 10व्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली व संपूर्ण संघ 194 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियासाठी सीन एबॉट आणि जॅक वाइल्डर्मथ यांना प्रत्येकी 3 विकेट मिळाल्या.
ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात मार्कस हॅरिसने 26, निक मॅडिनसन 19 तर जॅक वाइल्डर्मथ 12 धावा करून परतला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)