IPL Auction 2025 Live

टी-20 विश्वचषक IND vs PAK सामन्यात भारतीय फलदांज 'या' पाकिस्तानी गोलंदाजाची लावू शकतात लंका, घ्या जाणून

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून भारताविरुद्धच्या सामन्यात तो उपलब्ध असेल.

शाहीन शाह आफ्रिदी (Photo Credit: Twitter/T20WorldCup)

टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु अवघे काही दिवस राहिले आहे आणि या मध्ये भारताचा पाहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. हा सामना 23 तारखेला मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी शेजारील देशासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे की शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून भारताविरुद्धच्या सामन्यात तो उपलब्ध असेल. बिस्बेन येथे 15 ऑक्टोबरला तो पाकिस्तान संघात सामील होईल. केवळ भारत-पाकिस्तान सामनाच नाही, तर शाहीन आफ्रिदी 17 ऑक्टोबरला इंग्लंडविरुद्ध आणि 19 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्धच्या सराव सामन्यातही उपलब्ध असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

भारतीय फलंदाज पडू शकतात भारी

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज दुखापतीतुन सावरुन जरी पुनरागमन करत असेल तरी त्याच्यासाठी भारत पाकिस्तान सामना आव्हानात्मक असेल कारण भारतीय फंलदाज चांगल्या फार्म मध्ये असुन त्याची वाट लावू शकतात. भारताची ओपनिंग ही मोलाची कामगिरी निभावण्याचे काम करते. हिटमॅन आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल पाॅवर प्ले मध्ये शाहीन आफ्रिदीविरुद्ध षटकार चौकाराची बरसात करु शकतात. तसेच तिसऱ्या क्रमाकांवर येणार स्टार फलदांज विराट कोहली याचा पाकिस्तान विरुद्ध रेकाॅड चांगला असल्याने तोही पाकिस्तानी गोलदांजीवर भारी पडू शकतो.

सुर्यकुमारचा जलवा कायम

टीम इंडियाचा फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी हे वर्ष खास ठरले आहे. विशेषतः त्याचा जो फार्म टी-20 क्रिकेटमध्ये दिसला आहे, तो ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतरही कायम आहे. 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी सराव सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. यावरून सूर्यकुमार यादवचा टी-20 क्रिकेटमध्ये सध्या किती जबरदस्त फॉर्म आहे हे दिसून येते. त्यामुळे   शाहिन आफ्रिदीला भारतीय फलंदाजापासुन वाचुन राहावे लागेल हे दिसुन येते. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: क्रिकेटप्रेमींच मनोरंजन होणार डबल! आता थिएटरमध्ये पाहायला मिळणार टी-20 विश्वचषकाचे सामने)

जसप्रीत बुमराह आणि दीपक चहर स्पर्धेतुन बाहेर

भारतीय वेगवान गोलदांजाबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह आधीच या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी संघात कोणाला स्थान दिले जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोहम्मद सिराज याला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय, दीपक चहरच्या जागी राखीव खेळाडू म्हणून सिराजला संधी देण्यात आली आहे. तसेच सिराज, शमी आणि शार्दुल ठाकुर हे टी-२० विश्वचषकासाठी लवकरच उड्डान घेणार आहे.