IND vs AUS World Cup 2023: शुभमन गिल नाही तर कोण? ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाची काय असू शकते प्लेइंग 11, पाहा एका क्लिकवर

भारताला हा सामना जिंकून विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाला हरवणे इतके सोपे नसेल. त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होणार असल्याचे मानले जात आहे. या विश्वचषकापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

भारताचा विश्वचषकातील पहिला सामना उद्या म्हणजेच 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) होणार आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारताला हा सामना जिंकून विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाला हरवणे इतके सोपे नसेल. त्यामुळे हा सामना खूपच रोमांचक होणार असल्याचे मानले जात आहे. या विश्वचषकापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्फोटक फलंदाज शुभमन (Shubman Gill) गिल डेंग्यूमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असू शकते पाहूया.. (हे देखील वाचा: IND vs AUS World Cup 2023 Weather Report: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे होणार खराब, जाणून घ्या रविवारी कसे असेल चेन्नईचे हवामान?)

गिलच्या जागी ईशानला मिळणार सलामीची संधी 

शुभमन गिल पहिल्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी इशान किशनचा संघात समावेश होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आणि इशान किशन भारतासाठी सलामी करताना दिसणार आहेत. पहिली विकेट पडल्यानंतर विराट कोहली फलंदाजीला येईल. त्याचबरोबर केएल राहुलही फॉर्ममध्ये दिसत असल्याने त्याचाही संघात समावेश होणार आहे. या 4 पैकी कोणतेही 2 फलंदाज संघासाठी चांगली कामगिरी करू शकले तर टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारू शकते.

बुमराह गोलंदाजीत कहर करण्यास तयार 

जसप्रीत बुमराह आणि सिराज प्रामुख्याने भारताची गोलंदाजी सांभाळताना दिसतील. त्याचवेळी शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या मालिकेत अनेक विक्रमही केले. अशा स्थितीत भारताची गोलंदाजीही मजबूत स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून संघाचे नेतृत्व करतील.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

Share Now

Tags

ADAM ZAMPA Alex Carey Australia Team Cameron Green David Warner Glenn Maxwell Hardik Pandya Ishan Kishan Jasprit Bumrah Josh Hazlewood Josh Inglis KL Rahul Kuldeep Yadav Marcus Stoinis Marnus Labuschagne Mitch Marsh Mitchell Starc Mohammad Shami Mohammad Siraj Pat Cummins Ravichandran Ashwin Ravindra Jadeja Rohit Sharma Sean Abbott SHARDUL THAKUR Shreyas Iyer Shubman Gill Steve Smith SURYAKUMAR YADAV Team India Travis Head Virat Kohli अ‍ॅडम झाम्पा अ‍ॅलेक्स कॅरी ईशान किशन ऑस्ट्रेलिया संघ कुलदीप यादव कॅमेरॉन ग्रीन केएल राहुल ग्लेन मॅक्सवेल जसप्रीत बुमराह जोश इंग्लिस जोश हॅझलवूड टीम इंडिया ट्रॅव्हिस हेड डेव्हिड वॉर्नर पॅट कमिन्स मार्कस स्टॉइनिस मार्नस लॅबुशेन मिच मार्श मिचेल स्टार्क मोहम्मद शमी मोहम्मद सिराज रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा रोहित शर्मा विराट कोहली शार्दुल ठाकूर शुभमन गिल शॉन अॅबॉट श्रेयस अय्यर सूर्यकुमार यादव स्टीव्ह स्मिथ हार्दिक पंड्या
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement