ICC World Test Championship: ‘सबका बदला लेगा तेरा व्हाईट वॉकर’, Ashwin याच्या ट्विटला Wasim Jaffer ची मजेदार रिअक्शन, पहा Tweet
अश्विनने टीम इंडियाचा सहकारी चेतेश्वर पुजारासोबत गंभीर चर्चा करत असतानाचा फोटो शेअर केला ज्याच्यावर माजी भारतीय फलंदाज वासिम जाफरने ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सिरीज आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटातील एक डायलॉग जोडून एक संवाद तयार केला.
माजी भारतीय फलंदाज आणि आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जचे बॅटींग प्रशिक्षक वासिम जाफर (Wasim Jaffer) सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असतात. ते त्यांच्या मजेदार ट्वीटसाठीही प्रसिद्ध आहेत. इतकंच नाही तर ते बर्याचदा कोणत्याही इतर क्रिकेटपटू किंवा सोशल मीडिया चाहत्याला आपल्या मजेदार स्टाईल मिम्सने प्रतिसाद देतात. शुक्रवारी भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) ट्विटवरही जाफरने एक मजेदार रिअक्शन दिली. अश्विनने टीम इंडियाचा सहकारी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सोबत गंभीर चर्चा करत असतानाचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “पुजारा मला येथे काय सांगत आहे याचा अंदाज लावण्यासाठी बक्षीस द्या.” अश्विनच्या ट्विट पोस्टवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्यात जाफर यांचाही समावेश आहे. (Sanjay Manjrekar यांनी छेडला नवा वाद, म्हणाले-‘सार्वकालिन महान खेळाडूंमध्ये रविचंद्रन अश्विन येत नाही’; यूजर्सने केलं जबरदस्त ट्रोल)
अश्विन आणि पुजारा कशाविषयी बोलत आहेत याचा अंदाज बांधण्यासाठी जाफरने ‘गेम ऑफ थ्रोन्स’ सिरीज आणि ‘गँग्स ऑफ वासेपुर’ चित्रपटातील एक डायलॉग जोडून एक संवाद तयार केला. 2016 टी-20 वर्ल्ड कप आणि 2019 वर्ल्ड कप स्पर्धेची आठवण काढत जाफर म्हणाले की, पुजारा या दोन्ही स्पर्धांचा सूड घेईल. जाफरने लिहिले, “2016 वर्ल्ड टी-20, 2019 वर्ल्ड कप सेमीफायनल, सगळ्यांचा सूड घेईल तुझा हा व्हाईट कॉलर.” 2016 टी-20 विश्वचषक आणि 2019 विश्वचषक स्पर्धेत भारताने लीगच्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी बजावली होती पण आयसीसीच्या या दोन्ही स्पर्धेच्या उपांत्य फेरीत संघ अपयशी ठरला आणि त्यामुळे या दोन्ही स्पर्धांतून बाहेर पडले. आपल्या ट्विटद्वारे पंजाब किंग्जच्या बटिंह प्रशिक्षकाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात भारताला आपल्या चुकांची पुनरावृत्ती न करण्याचे संकेत दिले.
18 जून ते 22 जून या कालावधीत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची गाठ न्यूझीलंडशी आहे. नुकतीच टीम इंडिया युनायटेड किंगडममधील पाच दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण करून सराव करण्यासाठी मैदानात उतरली आहे. दुसरीकडे, किवी संघ सध्या यजमान इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. लॉर्ड्स येतील पहिला सामना अनिर्णित राहिला असून एजबॅस्टनच्या दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील आहेत.