ICC World Test Championship Final: न्यूझीलंडला मिळालं फायनलचं तिकीट; भारत आणि इंग्लंड संघात दुसऱ्या स्थानासाठी रेस
ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर न्यूझीलंड संघाला मोठा फायदा झाला असून त्यांनी यंदा 2021 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं तिकीट मिळवलं आहे. अशास्थितीत टीम इंडियापुढचं समीकरण सोप्प आहे. विराटसेनेला आगामी 4 पैकी किमान 2 सामने जिंकणे गरजेचे आहे.
ICC World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा (Australia Tour of South Africa) कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आला आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघात 3 सामन्यांची टेस्ट मालिका खेळली जाणार होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयानंतर न्यूझीलंडला (New Zealand) मोठा फायदा झाला असून त्यांनी यंदा 2021 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचं (World Test Championship Final) तिकीट मिळवलं आहे. जूनमध्ये लॉर्ड्स (Lords) येथे फायनलमध्ये स्थान मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांना मोठा फटका बसला आहे कारण त्यांना आता फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी इतर निकालांवर अवलंबून राहावे लागणार असेल. 2 फेब्रुवारी, 2021 पर्यंत, भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप टेबलमध्ये 71.7 टक्के पॉइंट्सनुसार अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या स्थानावर घसरण होणार नसल्याने त्यांनी 70 गुणांसह दुसर्या क्रमांकावर फायनलमधील स्थान निश्चित केले आहे. (IND vs ENG Test 2021: आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपची रस्सीखेच आणखी मजेदार, टीम इंडियाला इतक्या फरकाने इंग्लंडविरुद्ध जिंकावी लागेल टेस्ट सिरीज)
ऑस्ट्रेलिया 69.2 पॉईंट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका रद्द झाल्याने ते न्यूझीलंडच्या पुढे झेप घेऊ शकत नाही. अशास्थितीत टीम इंडियापुढचं (Team India) समीकरण सोप्प आहे. विराटसेनेला आगामी 4 पैकी किमान 2 सामने जिंकणे गरजेचे आहे. घरच्या मालिकेत इंग्लंडविरुद्धच्या 2-1 च्या निकालासह देखील ते फायनलचं तिकीट मिळवू शकतात. तथापि, जर त्यांनी 2 सामने गमावले तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडतील. इंग्लंडविरुद्ध मालिका 4-0, 3-0, 3-1, 2-0, 2-1 अशा फरकाने जिंकल्यास भारत WTC च्या अंतिम सामन्यात प्रवेश करेल. दुसरीकडे, इंग्लंड संघाला भारताविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची गरज आहे. जो रूटच्या इंग्लंड संघाला किमान 3 सामने जिंकण्याची गरज आहे. शिवाय, भारताविरुद्ध मालिकेत 4-0, 3-0, 3-1 असाही विजय मिळवल्यास इंग्लिश संघ फायनलमध्ये प्रवेश करू शकेल.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील पहिल्या दोन संघात इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर फायनल सामना रंगेल आणि विजेता संघाला टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाचा मान मिळेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)