ICC World Cup 2019: तर भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार नाही
वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप वेळ आहे.' ICC ची यात काही भूमिका असणार नाही.
ICC World Cup 2019: विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी 19 जून रोजी होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या (India vs Pakistan) सामन्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. पुलवामा येते 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर बीसीसीआय (BCCI) भारतीय संघाला पाकिस्तानसोबत सामना खेळू देणार नसल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दरम्यान, बीसीसीआयने या निर्णयाबाबत अद्याप थांबा आणि वाट पाहा (wait and watch) हे सूत्र अवलंबले आहे.
सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अंतिम निर्णय सरकारच घेणार आहे. सरकारने जर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यास मनाई केली तर, आम्ही तो सामना खेळणार नाही, असे बीसीसीआय सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत तरी बीसीसीआयकडे कोणाताही प्रस्ताव आला नाही.
ANI वृत्तससंस्थेने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आह की, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'काही काळानंतर सर्व परिस्थीतीत स्पष्ट होईल. वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होण्यास अद्याप वेळ आहे.' ICC ची यात काही भूमिका असणार नाही. (हेही वाचा, https://mrst1.latestly.com/sports/cricket/ipl-2019-schedule-for-1st-two-weeks-announced-chennai-super-kings-will-face-royal-challengers-bangalore-on-march-23-23054.html)
क्रिकेट जाणकारांनी म्हटले आहे की, सामना खेळण्यास नका दिल्यास पाकिस्तानला पॉईंट मिळतील. तसेच, ते अंतिम सामन्यात (भारत विरुद्ध पाकिस्तान) पोहोचले आणि आपण सामना खेळण्यास नकार दिला तर, ते वर्ल्डकप जिंकू शकतील. दरम्यान, याबाबत कोणत्याही अधिकृत यंत्रणेने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.