ICC World Cup 2019: केदार जाधव फिटनेस टेस्टमध्ये पास झाल्याने वर्ल्ड कपसाठी भारताच्या संघासोबत इंग्लडला जाणार

तसेच जगभरातील दहा संघ वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी उत्तम खेळी करण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसून येणार आहेत

Kedar Jadhav (Photo Credits-Twitter)

ICC World Cup 2019:  आईसीसी वर्ल्ड कप येत्या 30 मे पासून इंग्लड (England) येथे सुरु होणार आहेत. तसेच जगभरातील दहा संघ वर्ल्ड कपच्या सामन्यांसाठी उत्तम खेळी करण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसून येणार आहेत. तत्पूर्वी भारतीय संघातील (Team India) ऑलराऊंडर केदार जाधव (Kedar Jadhav) ह्याला संघात स्थान मिळणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र आता वर्ल्ड कपसाठी केदार जाधव खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

केदार जाधव ह्याला आयपीएलच्या (IPL) सामन्यादरम्यान डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे केदार हा वर्ल्ड कपसाठी खेळणार की नाही यासाठी प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र केदार याची दुखापत गंभीर नसल्याचे आयपीएलच्या सामन्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु आता केदार जाधवला झालेली दुखापत बरी झाली आहे.(ICC World Cup 2019: वर्ल्ड कप विजेता संघ होणार मालामाल, टूर्नामेंटच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम- 40 लाख डॉलर्स मिळणार)

तत्पूर्वी केदार जाधव इंग्लडला पाठवण्यापूर्वी भारतीय संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांनी त्याची फिटनेस टेस्ट घेतली. त्यामध्ये केदार या टेस्टमध्ये पास झाल्याने वर्ल्ड कपसाठी भारतीय संघासोबत इंग्लडला जाण्यासाठी सज्ज झाला आहे.