ICC World Cup 2019: अजिंक्य राहणे, अंबाती रायुडू ला वगळता मयंक अग्रवाल ची निवड करण्यामागे या व्यक्तीची मोठी भूमिका

शिवाय, भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड ने केलेलं कौतुक त्याच्या निवडीत महत्त्वाचं ठरलं अशी माहीती मिळते.

Mayank Agarwal of India. (Photo by Nathan Stirk/Getty Images)

आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये भारतीय संघात दुखापतीने सत्र संपता संपेना. आधी सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि आता अष्टपैलू विजय शंकर (Vijay Shankar). पायाला झालेल्या दुखापतीमुळे शंकरला विश्वकपमधून काढता पाय घ्यावा लागला आहे. शंभरच्या ऐवजी कर्नाटक च्या मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) ची संघात वर्णी लागली. मयंकने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि अंबाती रायडु (Ambati Rayudu) सारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकत बाजी मारली. रहाणे आणि रायडु यांच्या नावांची चर्चा असतानासुद्धा इंडिया ए (India A) कडून खेळताना केलेल्या कामगिरीच्या जोरावर मयंक अग्रवालची निवड झाली. (ICC World Cup 2019: विजय शंकर पायाच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप मधून बाहेर; मयंक अग्रवाल ला संधी मिळण्याची शक्यता)

डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे विजय शंकरला त्यातून सावरण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी त्याला संघातून वगळण्यात येत आहे, अशी माहिती बीसीसीआय (BCCI) ने दिली. दरम्यान, मयंकची निवड करण्यामागे त्याने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत केलेली कामगिरी तर वरचढ ठरलीच. शिवाय, भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड (Rahul Dravid) ने केलेलं कौतुक त्याच्या निवडीत महत्त्वाचं ठरलं अशी माहीती मिळते. अजिंक्य रहाणे मधल्या षटकांत खेळताना अडखळतो. तसेच फिरकीपटूंचा सामना करणे रहाणेला अवघड जाते. दुरीकडे, रायडुच्या कामगिरीत सातत्य नसल्यानं त्याचं नाव पुढे येऊ शकलं नाही.

मयंकने मागील ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध खेळल्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र, अद्यापही मयंकने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. कर्नाटक कडून क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूने आतापर्यंत एकूण 75 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 48. 71 च्या सरासरीने 3605 धावा केल्या आहेत.