ICC World Cup 2019: सलामीवीर शिखर धवन विश्वकप मधून बाहेर; रिषभ पंतला संधी

वेदना होत असतानाही धवन खेळत राहिला आणि सामन्यात 109 चेंडूत 117 धावा केल्या.

(Photo Credits: Getty)

भारतीय सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) यंदाच्या विश्वचषक 2019 स्पर्धेतून बाहेर पडला आहे कारण शोपिसच्या उर्वरित सामन्यासाठी नियोजित वेळेत पुनरागमन करण्याची स्थिती नाही. सूत्रांच्या माहिती प्रमाणे, धवनला दुखापतीतून सावरायला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ लागणार असल्याने त्याला भारतीय संघातून बाहेर केले गेले आहे.

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध 19 जूनला झालेल्या सामन्यात धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. वेदना होत असतानाही धवन खेळत राहिला आणि सामन्यात 109 चेंडूत 117 धावा केल्या. दुखापतीमुळे धवन क्षेत्ररक्षणासाठी पण मैदानात आला नाही. त्याच्या जागेवर रविंद्र जडेजाने पुर्ण 50 ओव्हर फील्डिंग केली होती. भारताने त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 36 रनाने हरवले होते. धवन त्या सामन्यात 'मॅन ऑफ द मॅच' होता.

दुसरीकडे, धवनच्या पर्याय म्हणून रिषभ पंत (Rishabh Pant) इंग्लंड ला पोहचला आहे आणि जोमाने सराव करत आहे.