India Women vs Pakistan Women Head to Head Record: भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यात आज हायव्होल्टेज सामना, जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी

तर भारताच्या वाटेला पहिल्याच सामन्यात पराभव आला आहे. त्यामुळे भारतासाठी साखळी फेरीतील प्रत्येक सामना करो या मरोची लढाई झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताची कसोटी लागणार आहे. वर्ल्डकपमध्ये आपले स्थान मजबूत ठेवण्यासाठी भारतीय संघाला चांगला कस लावावा लागणार आहे. जाणून घ्या हेड-टू-हेड कामगिरी.

Photo Credit- X

India Women vs Pakistan Women Head to Head Record: वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Womens T20 World Cup 2024) भारताची सुरुवात निराशाजनक झाली आहे. न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात भारतासमोर अडचण निर्माण केली आहे. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये आपले स्थान मजबूत ठेवण्यासाठी भारताला आता पुढचे तिन्ही सामने जिंकणं गरजेचं आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला लढत द्यायची आहे. त्यामुळे भारतासमोर कठीण आव्हान आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार आहे. भारताचा साखळी फेरीतील दुसरा सामना पाकिस्तानशी होत आहे. पारंपरिक प्रतिस्पर्धी असल्याने आधीच संघावर दडपण येणार (IND vs PAK) आहे. त्यात पराभव झाला तर स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ दुहेरी कात्रीत अडकला आहे.

टी20 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ 15 वेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने 12, तर पाकिस्तानने 3 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचं पारडं जड आहे. गेल्या पाच सामन्यांचा निकाल पाहिला तर टीम इंडियाने 4, तर पाकिस्तानने एकच सामना जिंकला आहे. दुसरीकडे, वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा इतिहास पाहिला तर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत. यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला 5 वेळा पराभूत करण्यात यश मिळवलं आहे. तर पाकिस्तानने दोन वेळा विजय मिळवला आहे. पण असं असलं तरी भारतासाठी पुढचा प्रत्येक सामना आता जर तरची लढाई आहे.

सामना किती वाजता सुरू होतो?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

कधी आणि कुठे होणार सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषकाचा सामना रविवार, 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

भारत विरुद्ध पाकिस्तान शेवटच्या पाच सामन्यांचे निकाल

2024 – भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला.

2023 – भारत 7 गडी राखून विजयी

2022 – पाकिस्तान 13 धावांनी विजयी

2022 – भारत 8 विकेट्सने विजयी

2018 – भारत 7 गडी राखून जिंकला

टीम इंडियाचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी. हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजना सजीवन.